जिओचे आता ‘गिगाफायबर’

पीटीआय
शुक्रवार, 6 जुलै 2018

अकराशे शहरांत अतिवेगवान ब्रॉडबॅंड सेवा पुरविणार 
मुंबई - देशातील अकराशे शहरांमध्ये अतिवेगवान जिओ ‘गिगाफायबर’ ही स्थिरजोडणी ब्रॉडबॅंड सेवा देण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुरुवारी केली. याचबरोबर ‘जिओ फोन२’ची घोषणाही त्यांनी केली. 

अकराशे शहरांत अतिवेगवान ब्रॉडबॅंड सेवा पुरविणार 
मुंबई - देशातील अकराशे शहरांमध्ये अतिवेगवान जिओ ‘गिगाफायबर’ ही स्थिरजोडणी ब्रॉडबॅंड सेवा देण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुरुवारी केली. याचबरोबर ‘जिओ फोन२’ची घोषणाही त्यांनी केली. 

ॲमेझॉनसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी ई-कॉमर्स कंपनी स्थापन करण्याचे सूतोवाचही मुकेश अंबानी यांनी या वेळी केले. याआधी रिलायन्सने मोफत व्हॉइस कॉल आणि अतिशय कमी किमतीत इंटरनेट सेवा देऊन दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ घडविली होती. तेल ते दूरसंचार क्षेत्रापर्यंत विस्तारलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय २०२५ पर्यंत १२५ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा कंपनीचा मानस आहे. 

कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण 
सभेत भागधारकांसमोर बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, ‘‘स्थिर जोडणी ‘गिगाफायबर’ ब्रॉडबॅंडसाठी ग्राहक १५ ऑगस्टपासून नोंदणी करू शकतील. ग्राहकांना केवळ एका फायबरद्वारे अतिशय वेगवान इंटरनेटसह इतर सेवा मिळतील.’’ जिओच्या ब्रॉडबॅंड सेवा सुरू होण्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच, या सेवेचे दरही जाहीर करण्यात 
आलेले नाहीत. 

जिओ फोन २ 
    व्हॉट्‌सॲपसह फेसबुक, यूट्यूब 
    क्‍यूआरटी कीपॅड 
    १५ ऑगस्टपासून नोंदणी 
    किंमत २,९९९ रुपये 
    जुना जिओफोन देऊन पाचशे रुपयांत जिओफोन २  

तांत्रिक तपशील
डिस्प्ले : २.४० इंच 
रॅम : ५१२ एमबी
रिअर कॅमेरा : २ मेगापिक्‍सेल फ्रंट कॅमेरा : ०.३ मेगापिक्‍सेल 
बॅटरी : २००० एमएएच 
स्टोरेज : २४०-३२० पिक्‍सेल 
ओएस : केएआय ओएस

गिगाफायबर 
अतिवेगवान स्थिर जोडणी ब्रॉडबॅंड सेवा
लार्ज स्क्रीन टीव्हीवर अल्ट्रा एचडी मनोरंजन
मल्टी-पार्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग 
व्हाइस ॲक्‍टिव्हेटेड व्हर्च्युअल असिस्टन्स
व्हर्च्युअल रिॲलिटी गेमिंग
डिजिटल शॉपिंग
स्मार्ट होम सोल्यूशन्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jio Mobile Gigafiber