जिओ’चा नवा धमाका; येतोय स्मार्टफोन!

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

मुंबई: उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओचा बहुप्रतिक्षित '4 जी व्हीओएलटीई' फीचर फोन लवकरच बाजारपेठेत दाखल होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. हा फीचर फोन दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात येणार असून या फोनमध्ये क्वालकॉम आणि स्प्रेडट्रम चिपसेट्स असतील. क्वॉलकॉमचा चिपसेट असणाऱ्या फोनची किंमत 1800 रुपये तर स्प्रेडट्रम प्रोसेसर असणाऱ्या फोनची किंमत 1740 रुपये असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

फोरजी सिमसोबत सादर होणाऱ्या या फोनमध्ये विविध जिओ अॅप्सदेखील आधीपासूनच उपलब्ध असणार आहेत. या फोनच्या वैशिष्ट्यांमध्ये 2.4 इंचाची स्क्रीन, 512 एमबी रॅम आणि 4 जीबी इंटर्नल मेमरी, 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेराचा समावेश असेल. त्याचप्रमाणे, फोरजी कनेक्टिव्हीटीसह वायफाय, एनएफसी आणि जीपीएस सुविधादेखील असणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या फोनविषयी सर्वत्र चर्चा सुरु आहे. काही संकेतस्थळांवर या फोनची छायाचित्रेदेखील प्रसिद्ध झाली आहेत. कंपनी ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी कदाचित अवघ्या 999 ते 1,500 रुपयांमध्येदेखील उपलब्ध करुन देऊ शकते. या फीचर फोनच्या निमित्ताने कंपनी ग्रामीण बाजारपेठेत विस्तार वाढविण्याची योजना करीत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jio smartphone