खुशखबर! 'जिओ'चा नवा फोन पुन्हा करणार 'धमाका'

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

रिलायन्स 'जिओ' पुन्हा एकदा नवीन धमाका करण्याच्या तयारीत आहे. जिओ लवकरच बाजारात नवा फोन आणणार आहे.

मुंबई: रिलायन्स 'जिओ' पुन्हा एकदा नवीन धमाका करण्याच्या तयारीत आहे. जिओ लवकरच बाजारात नवा फोन आणणार आहे. रिलायन्स रिटेलच्या ४जी फोनची मागणी कमी झाल्याने पुन्हा एकदा कंपनीने नवा फोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. 

'जिओ' सध्या नव्या फोनवर काम करत असून या नव्या फोनमध्ये मीडिया टेक चिपसेट असणार आहे. लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दूरसंचार कंपन्यांसोबत सध्या काम करत असल्याचे  मीडिया टेकच्या वायरलेस कम्युनिकेशनच्या युनिटचे व्यवस्थापकीय संचालक टीएलली यांनी सांगितले.  शिवाय फोनमध्ये KaiOS या ऑपरेटिंग सिस्टिमवर काम सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. मीडिया टेकने(MediaTek) याआधी Lyf या ब्रँड अंतर्गत स्वस्त आणि मस्त अँड्रॉईड फोन बाजारात आणले होते. 

भारतात सध्या जिओ फोनसाठी कॉलकॉम आणि Unisoc कंपन्या चिपसेट उपलब्ध करून देतात. याआधी देखील जिओने १५०० रुपयांमध्ये फिचर फोन भारतीयांना उपलब्ध करून दिला होता.  जिओचा फोन घेण्यासाठी त्यावेळी जिओच्या स्टोअरवर मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. आता पुन्हा एकदा येणार नवीन फोन कसा असेल याबाबत सगळीकडे उत्सुकता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JioPhone 3 To Run On MediaTek Chipset With KaiOS