Job Cuts :आर्थिक मंदीचा मीडिया कंपन्यांना फटका; कर्मचारी कपातीचे मोठे संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Job cut

Job Cuts :आर्थिक मंदीचा मीडिया कंपन्यांना फटका; कर्मचारी कपातीचे मोठे संकट

मोठ्या कंपन्यांच्या कर्मचारी कपातीनंतर आता जगभरातील मीडिया आणि मनोरंजन उद्योगालाही नोकर कपातीचा फटका बसला आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे जागतिक आर्थिक मंदीच्या काळात जाहिरातदारांनी खर्च कमी केला आहे.

अ‍ॅक्सिओस (Axios) च्या मते, मीडिया इंडस्ट्रीमध्ये या वर्षी ऑक्टोबरपर्यंत 3,000 हून अधिक नोकर्‍या कमी झाल्या आहेत आणि आणखी काही जाण्याच्या मार्गावर आहेत. वॉर्नर ब्रॉस डिस्कव्हरीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

"सीएनएनचे प्रमुख ख्रिस लिच यांनी गेल्या आठवड्यात कर्मचार्‍यांना चेतावणी दिली आहे की, पुढील महिन्यापासून कंपनी मोठ्या प्रमाणावर नोकर कपात करेल,"

पॅरामाउंट ग्लोबल ते वॉल्ट डिस्ने कंपनी पर्यंत, मीडिया कंपन्यांनी कर्मचारी कपात, नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्त करणे आणि इतर खर्च कमी करण्याची घोषणा केली आहे. "कॉमकास्टच्या केबल युनिटने गेल्या महिन्यात नोकर कपात केली आहे. त्यांच्या मनोरंजन विभाग, एनबीसीयुनिव्हर्सल विभागात देखील नोकर कपातीची शक्यता आहे," असे अहवालात नमूद केले आहे.

हेही वाचा: Bank Holidays : डिसेंबर महिन्यात बँका १३ दिवस बंद; उरकून घ्या महत्त्वाची कामे

अ‍ॅक्सिओस नुसार 2020 मध्ये Politico मधून लॉन्च केलेली टेक न्यूज वेबसाइट वर्षाच्या अखेरीस बंद होईल.  आणि सुमारे 60 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाईल अशी शक्यता आहे. व्हाईस मीडिया सीईओ नॅन्सी दुबॅक यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीला छोट्या कर्मचारी कपातीनंतर 15 टक्क्यांपर्यंत कंपनीचा खर्च कमी करण्याची योजना आहे. तज्ञांच्या मते वृत्तपत्र उद्योगाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वितरण आणि कामगार खर्चाचा सामना करावा लागला होता.

"यूएसए टुडेची मूळ कंपनी गॅनेटने सांगितले की, ऑगस्टमध्ये 400 लोकांना कामावरून काढून टाकल्यानंतर आता आणखीन कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्याच्या मार्गावर आहेत," असे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा: TRAI New Tariff : केबल आणि DTH चे बिल होणार स्वस्त; 'या' दिवसापासून नवे नियम लागू

क्रंचबेस न्यूज टॅलीनुसार, तंत्रज्ञान उद्योगात नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत यूएस टेक क्षेत्रातील 73,000 हून अधिक कर्मचारी कपात करण्यात आली आहे. Netflix सारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी यावर्षी नोकऱ्या कमी केल्या आहेत.