गुंतवणुकीत कर्नाटकची आघाडी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

मुंबई - गुंतवणूकदारांना सेवा सुविधा देऊन तब्बल ८३ हजार २३६ कोटींचे गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या कर्नाटकाने गुजरात आणि महाराष्ट्रवर मात केली आहे. वाणिज्य खात्याच्या औद्योगिक गुंतवणूकविषयक ताज्या अहवालात सप्टेंबरअखेर देशभरात एकूण तीन लाख ३८ हजार ५६७ कोटींचे गुंतवणूक करार झाले असून, त्यातील २४.५८ टक्के गुंतवणूक कर्नाटकात होणार आहे. कर्नाटकने सलग तिसऱ्या वर्षी गुंतवणुकीत आघाडी घेतली आहे. 

कर्नाटकमध्ये केवळ ९२ प्रकल्पांमधून ८३ हजार २३६ कोटींची गुंतवणूक होणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कर्नाटकात निवडणुका पार पडल्यामुळे गुंतवणुकीचा ओघ आटला होता. मात्र निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा उद्योजक कर्नाटककडे वळाल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन महिन्यांत २३ गुंतवणुकीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. ज्यात वाहन, लोहखनिज आणि पोलाद, सिमेंट, आयटी सेवा, औषध निर्माणसारख्या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहेत. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत गुजरात सरकारकडे ५९ हजार ८९ कोटींचे गुंतवणुकीचे ३४७ प्रस्ताव आले आहेत. महाराष्ट्र सरकारकडे २७५ प्रकल्पांचे प्रस्ताव आले असून, यातून राज्यात ४६ हजार ४२८ कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. दरम्यान, थेट परकी गुंतवणुकीत अग्रेसर असलेल्या गुजरात आणि महाराष्ट्राऐवजी उद्योजक कर्नाटकला पसंती देत असल्याचे या अहवालातील आकडेवारीनुसार दिसून आले आहे.

ईशान्येकडील राज्ये गुंतवणुकीच्या प्रतीक्षेत
केंद्र सरकार ईशान्यकडील राज्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. पायाभूत सेवा-सुविधांचा अभाव आणि अस्थिरतेमुळे ईशान्य भारतातील बहुतांश राज्ये गुंतवणूकदारांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले आहे. चालू वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये मेघालय, त्रिपुरा वगळता अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, नागालॅंडमधील अद्याप गुंतवणूक झालेली नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka State Top in Investment