सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी चांगली; गुंतवणूक करण्याचे आहेत अनेक फायदे

सुकन्या योजना
सुकन्या योजनाsakal

कोणतीही व्यक्ती आपल्या मुलांचे आणि स्वतःचे भविष्य सुधारण्याचा प्रयत्न करीत असते. आर्थिक स्तरावर बोलायचे झाल्यास, उच्च शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करणे हे एक मोठे आव्हान असते. यात बचत आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. खरं तर आपण लहानपणापासूनच किंवा नोकरीच्या सुरवातीपासूनच बचत आणि गुंतवणूक करण्याची सवय लावायला हवी. जर मुलींच्या भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास मुलींचे उज्ज्वल भविष्य सुनिश्‍चित करण्यासाठी सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना आहे. या योजनेंतर्गत पालक 10 वर्षांपेक्षा लहान मुलीच्या नावावर खाते उघडू शकतात. या योजनेत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलीच्या उच्चशिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात.

सुकन्या योजना
IMF On Indian Economy: भारताच्या आर्थिक विकास दरात आणखी घट

सुकन्या समृद्धि योजनेचा व्याजदर

एखाद्या व्यक्तीला आपल्या मुलीसाठी गुंतवणूक करायची असेल तर सुकन्या समृद्धि योजना सर्वोत्तम आहे. यामध्ये जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडता येते. तसेच या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यात वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात. सरकारच्या सर्व बचत योजनांच्या तुलनेत सुकन्या समृध्दी योजनेवरील व्याज अधिक आहे. सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याज दर अजूनही .6..6 टक्के आहे. हा कंपाऊंड वार्षिक व्याज दर आहे. सरकार प्रत्येक तिमाहीच्या सुरूवातीस व्याज दर जाहीर करते. जर एखाद्या व्यक्तीने मुलीचे वय कमी असताना या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरवात केली असेल तर ते या योजनेमध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात.

सुकन्या योजना
Paytmमध्ये नोकरीची संधी! 20,000 Sales Executivesची मेगा भरती

आपण किती गुंतवणूक करू शकता

हे खाते किमान 250 रुपयांद्वारे उघडता येते. कोणतीही व्यक्ती या योजनेत एका वर्षात किमान 250 ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकते. या खात्यात एकरकमी किंवा हप्त्यात रक्कम जमा केली जाऊ शकते. खाते उघडल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 15 वर्षे पूर्ण होईपर्यंत ही रक्कम खात्यात जमा केली जाऊ शकते. या योजनेत मिळणारे व्याज हे करमुक्त असते.

सुकन्या योजना
बावनकशी शुद्ध सोनं खरेदी करा ऑनलाइन, हे आहेत विविध पर्याय

आयकरात सूट

मुलगी दहावी उत्तीर्ण झाल्यावर किंवा 18 वर्षांची झाली की आपण आंशिक पैसे काढू शकता. त्याचा परिपक्वता कालावधी 21 वर्षे आहे. सुकन्या समृद्धी योजनामध्ये दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीवर आयकरात सूट मिळते. या योजनेत गुंतवणूक करून कलम 80 सी अंतर्गत हा लाभ घेता येतो.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे सुकन्या समृद्धी योजना खाते सहजपणे एका बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या बँकेत हस्तांतरित करता येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला अर्ज भरावा लागेल व तो संबंधित पोस्ट किंवा बँकेत आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com