esakal | Paytmमध्ये नोकरीची संधी! 20,000 Sales Executivesची मेगा भरती
sakal

बोलून बातमी शोधा

paytm

Paytmमध्ये नोकरीची संधी! 20,000 Sales Executivesची मेगा भरती

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : शेअर मार्केटमध्ये आयपीओ आणण्याच्या पार्श्वभूमीवर Paytm मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती केली जाणार आहे. Paytm ने फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्हजची (FSE) भरतीची घोषणा केली आहे. यामुळे अंडरग्रॅज्युएट लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. (Paytm plans to hire 20000 sales executives ahead of IPO aau85)

हेही वाचा: Pegasus row: "शशी थरुर हटाओ"; संसदीय समितीच्या सदस्यांची मागणी

आपल्या या FSE कार्यक्रमांतर्गत Paytm २०,००० सेल्स एक्झेक्युटिव्ह्जची भरती करणार आहे. हे एक्झेक्युटिव्ह दुकानदारांना आणि युजर्सना डिजिटल पेमेंट करणे आणि स्विकारणे याबाबत शिक्षित करणार आहेत. तसेच कंपनीची विविध डिजिटल प्रॉडक्ट्स प्रमोट करतील.

Paytm काय सुविधा देणार पाहा?

1) पगार -

भरती करण्यात आलेले फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह्जना जास्तीत जास्त ३५,००० रुपये कमावण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये महिन्याचा पगार आणि कमिशनचाही समावेश असेल.

2) कामाचं स्वरुप -

Paytm चा फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह्ज कार्यक्रमांतर्गत Paytm आपले सर्व प्रकारचे प्रॉडक्टचं प्रमोशन करणार आहे. यामध्ये पेटीएम ऑल इन वन क्युआर कोड, पेटीएम ऑल इन वन पीओएस मशिन्स, पेटीएम साउंड बॉक्स तसेच इतर प्रॉडक्ट्स, तसेच पेटीएमचं वॉलेट, युपीआय, पेटीएम पोस्टपेड, मर्चंट्स लोन आणि इन्शुरन्स यांचा समावेश असेल.

3) पात्रता -

ज्या व्यक्तीचं वय वर्षे १८ पूर्ण आहे. तसेच ज्याचं शिक्षण १० वी किंवा १२ पर्यंत झालं आहे. तसेच ज्यांचं शिक्षण अंडरग्रॅज्युएट झालं आहे, तसेच त्याच्याकडे अँड्रॉईड स्मार्टफोन आहे. हे लोक Paytm App च्या माध्यमातून या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. ज्या उमेदवारांकडे दुचाकी आहे, तसेच ज्यांना प्रवासाचा कंटाळा नाही, तसेच ज्यांना पूर्वीचा सेल्सचा अनुभव आहे, अशा लोकांना यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अर्जदाराला स्थानिक भाषेची आणि भागाची चांगली माहिती असणं गरजेचं आहे.

हेही वाचा: Engineering: १० वर्षांत घटल्या सर्वाधिक जागा; यंदा ६३ इन्स्टिट्यूट्स बंद

Paytmचा येणार IPO

Paytm लवकरच शेअर बाजारात आपला १६,६०० कोटींचा IPO आणण्याच्या तयारीत आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत तो बाजारात येईल. १५ जुलै रोजी कंपनीने सेबीकडे याबाबत पत्रव्यवहार आणि कागदपत्रेही सुपूर्द केली आहेत. ग्राहक, व्यापारी, पैशांचे व्यवहार आणि महसूल याबाबत Paytm ही भारताची आघाडीची डिजिटल इकोसिस्टीम असल्याचं पेटीएमनं म्हटलं आहे.

loading image
go to top