LIC तील गुंतवणुकीनंतर लगेचच मिळेल प्रतिमाह 6 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे स्कीम

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

लाईफ इश्यूरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) च्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे अनेक अर्थाने फायदेशीर मानलं जातं.

नवी दिल्ली : लाईफ इश्यूरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) च्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे अनेक अर्थाने फायदेशीर मानलं जातं. जर आपल्याला विना जोखीम सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर LIC च्या 'जीवन अक्षय' पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायचा पर्याय उत्तम आहे. या पॉलिसीद्वारे आपण आपल्यासाठी अथवा आपल्या परिवाराच्या एखाद्या सदस्यासाठी प्रत्येक महिन्यासाठी पेन्शनची व्यवस्था करु शकता. 

ही एक एन्यूटी योजना आहे, ज्यात एकरकमी गुंतवणूक करून पेन्शनचे फायदे दिले जातात. या पॉलिसीमधील अटींबाबत बोलायचे झाल्यास 30 ते 85 वर्षाचा कोणताही भारतीय व्यक्ती यात गुंतवणूक करु शकतो. कमीतकमी वर्षिक पेन्शन 12 हजार रुपये ठरवली गेली आहे. या साठी कमीतकमी एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक आवश्यक आहे.  जास्तीतजास्त गुंतवणुकीसाठी कसलीही सीमा नाहीये. 
पॉलिसी सुरु केल्याच्या तारखेच्या 3 महिन्यांनंतर लोन सुविधा देखील याद्वारे प्राप्त होते. एका परिवारातील कुणीही दोन सदस्य यामध्ये जॉइंट एन्यूटी घेऊ शकतात. वार्षिक, अर्धवार्षिक, तिमाही आणि मासिक आधारावर यातून पेन्शन प्राप्त होऊ शकतं. या पॉलिसीमध्ये पेन्शन घेण्यासाठी वेगवेगळे 10 पर्याय उपलब्ध असतात.

हे आहेत पर्याय
पर्याय A :
इमेडिएट एन्यटी फॉर लाइफ द्वारे गुंतवणुकीनंतर लगेचच पेन्शनचा फायदा मिळू लागतो. हा लाभ तोपर्यंत मिळतो जोवर त्या पॉलिसीधारकाचा मृत्यू होत नाही. या पॉलिसीत अट अशी आहे की, पॉलिसीधारकाला डेथ बेनिफिट मिळत नाही. 

पर्याय B :

5 वर्षाच्या गारंटिड पीरियडसोबत इमिडीयट एन्यूटी आणि आयुष्यभर पेमेंट करावं लागतं. या पर्यायामुळे पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन तर मिळतेच मात्र यात 5 वर्षाची गारंटेड पीरियडसोबत नॉमिनीला फायदा मिळतो. समजा जर कुणी या पर्यायाच्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करतो तर त्याला आजीवन पेन्शन तर मिळेल तसेच पाच वर्षाच्या आत मृत्यू झाल्यास नॉमिनीला पेन्शन प्राप्त होईल. नॉमिनीला पेन्शन पॉलिसीला  पाच वर्ष पुर्ण होईपर्यंत मिळेल. याप्रकारेच C पर्यायामध्येही मृत्यूच्या परिस्थितीत नॉमिनीला 10 वर्षे म्हणजेच पॉलिसी पूर्ण होईपर्यंत, D पर्यायामध्ये 15 वर्ष आणि E पर्यायामध्ये 20 वर्षांपर्यंत पेन्शन मिळेल.

पर्याय F :
पर्चेस प्राईसच्या रिटर्नसोबत आयुष्यभर एन्यूटीचे पेमेंट. या पर्यायाद्वारे पॉलिसीधारक जोवर जीवंत राहिल तोवर पेन्शन मिळत राहिल. मृत्यू झाल्यानंतर पर्चेस प्राइस नॉमिलनीला परत केली जाईल. 

पर्याय G :
वर्षभर 3 टक्के साधारण व्याजासहित आयुष्यभर एन्यूटीचे पेमेंट. हा पर्याय A पर्यायासारखाच आहे. यामध्ये फरक इतकाच आहे की, प्रत्येक वर्षी पेन्शनची अमाऊंट तीन टक्के वाढत जाईल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know all features of LIC jeevan akshay pension policy for everymonth annuity