होईल बंपर कमाई, अत्यंत कमी बजेटमध्ये सुरु करा जास्त मागणी असणारा 'हा' व्यवसाय

Cutlery Business
Cutlery BusinessSakal
Updated on

देशभरात कोरोनामुळे सर्वांचं कंबरडं मोडलं आहे. अशात सातत्याने होणारी पगार कपात किंवा नोकरी जाणे यामुळे सामान्य नागरिक चांगलेच कंटाळले आहेत. मात्र आता वेळ आली आहे पैसे कमावण्याची. अशा कठीण काळात तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात, ज्याची बाजारात प्रचंड मागणी आहे. या बातमी आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबाबत सांगणार आहोत, ज्यासाठी केवळ 1 लाख 14 हजार गुंतवून तुम्ही दर महिन्याला चांगली कामे करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे या व्यवसायात सरकार देखील तुमची मदत करणार आहे. (Know How to earn more money from cutlery manufacturing business)

सरकार देते कर्जाची सुविधा

जर तुम्ही चांगला परतावा देणाऱ्या व्यवसायाबाबत विचार करत असाल, तर तुम्ही धातूपासून बनवण्यात येणाऱ्या कटलरी (Cutlery Business) म्हणजेच चमचे, काटे बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकतात. कटलरी व्यवसायासाठी सरकारच्या मुद्रा (Mudra Loan) योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज मिळू शकतं.

तुम्ही काय काय बनवू शकतात ?

'कटलरी'ची मागणी घरा घरात असते. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकतात. या व्यवसाया अंतर्गत तुम्ही काही साधी अवजारे आणि शेतीसाठीचीही काही अवजारे बनवू शकतात. याशिवाय घरात कटलरीची मागणी असतेच.

Cutlery Business
दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना रोजगारक्षम बनविणार बिंदू कॅप

किती पैसे कमावता येतील

एकूण सेटअपचा खर्च - 1.8 लाख रुपये. यामध्ये वेल्डिंग मशीन सेट, बफिंग मोटर, ड्रिलिंग मशीन, बेंच ग्रिंडर, हॅन्ड ग्रिंडर, बेंच, पॅनल बोर्ड आणि इतर साहित्य येईल. याशिवाय 2 महिन्याच्या कच्च्या मालासाठी 1 लाख 20 हजार रुपये खर्च येतो. याशिवाय पगारासाठी प्रति महिना 30 हजारांचा खर्च, म्हणजेच एकूण 3.3 लाखांचा खर्च येतो.

Cutlery Business
Credit Card सांभाळून करा क्रेडिट कार्डचा वापर, नाहीतर होतील वांदे

तुम्हाला टाकावे लागणार 1.14 लाख रुपये

या एकूण खर्चापैकी तुम्हाला केवळ 1.14 लाख रुपये खर्च करावा लागेल. बाकी खर्च सरकारच्या मदतीने तुम्ही करू शकतात. सरकारच्या मदतीने तुम्ही मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकतात. तशी सुविधा उपलब्ध आहे.

तुम्ही अर्ज करू शकतात

यासाठी तुम्ही PM मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत अर्ज करू शकतात. याशिवाय तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो, ज्यामध्ये तुम्हाला स्वतःचं नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, तुमचं शिक्षण, तुमचं उत्पन्न आणि किती कर्ज हवं आहे याबाबत माहिती भरावी लागते.

Cutlery Business
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा पक्का खबरी आहे PAN CARD, नंबर्स करतात सर्व पोलखोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com