Credit Card Bill: क्रेडिट कार्ड ड्यु डेट निघून गेली? काळजी करू नका, 'हा' पर्याय वापरून सहज टाळा दंड

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यामुळे कोणत्या कार्डची ड्यु डेट काय हे लक्षात राहत नाही. एकदा का ड्यु डेट पुढे गेली की पेनल्टी म्हणजेच दंड भरावा लागतो.
Credit Card
Credit CardSakal

Credit Card Billing Cycle: बऱ्याचदा लोक एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरतात. पण प्रॉब्लेम असा होतो की, एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यामुळे कोणत्या कार्डची ड्यु डेट काय हे लक्षात राहत नाही. सगळं मॅनेज करणं अवघड होऊन जातं. आणि एकदा का ड्यु डेट पुढे गेली की पेनल्टी म्हणजेच दंड भरावा लागतो. हा दंड टाळायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे.

खरं तर आरबीआयच्या आदेशानुसार, ड्यू डेट नंतरही 3 दिवस गेले तरी बँक तुमच्याकडून पेनल्टी घेऊ शकत नाही. तसा त्यांना अधिकार नसतो. जर समजा तुमची ड्यु डेट 15 डिसेंबर असेल तर तुम्हाला 18 तारखेपर्यंत कोणताही दंड आकारला जाणार नाही. आरबीआयने क्रेडिट कार्ड ग्राहकांना बिल भरण्यासाठी अतिरिक्त 3 दिवसांची मुदत दिली आहे.

आरबीआयने 21 एप्रिल 2022 रोजी या संदर्भात आदेश जारी केला होता. आता जर तुम्ही ड्यु डेटच्या 3 दिवसांनंतरही पेमेंट भरले तरी तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होणार नाही.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

क्रेडिट कार्डची बिलिंग सायकल समजून घ्या

जो क्रेडिट कार्ड वापरतो तोच क्रेडिट कार्डची बिलिंग सायकल स्वतःच्या इच्छेनुसार ठरवतो. पण ही सायकल किती दिवसांची असेल हे मात्र बँक ठरवते. म्हणजे ही बिलिंग सायकल 27 दिवसांची असेल की 31 दिवसांची असेल हे बँक तुम्हाला सांगेल. त्यानुसार तुम्ही तुमची मंथली सायकल सेट करू शकता.

तुमच्या 2 बिलिंग स्टेटमेंट्समधील दिवसांना बिलिंग सायकल म्हणतात. समजा तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट 28 नोव्हेंबर पासून तयार झालं आहे तर तुमची नवीन बिलिंग सायकल 29 तारखेपासून सुरू होईल. आणि पैसे भरण्याची ड्यु डेट 28 तारखेनंतर 15 दिवसांनी असेल. त्यानंतर बँक तुम्हाला पेमेंटसाठी जास्तीचे 15 दिवस देते. पण, आता आरबीआयच्या आदेशानंतर, तुम्हाला आणखी 3 दिवस मिळतील.

Credit Card
Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

पेमेंट वेळेवर न भरल्यास काय होतं?

जर तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरलं नाही तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी झाला तर तुम्हाला कर्ज घेताना किंवा भविष्यात पुन्हा क्रेडिट कार्ड मिळवताना अडचणी येतील. दुसरीकडे, तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरल्यास, तुम्हाला कर्ज सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळेल.

Credit Card
Share Market Closing : Sensex मध्ये 400 अंकाची तेजी, आयटी अन् बँकीग शेअर्समध्ये वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com