LIC IPO गुंतवणूकदारांनी सबस्क्राईब करावे की नाही?

आज आम्ही LIC आयपीओबद्दल काही पॉझिटीव्ह-नेगिटीव्ह पॉईंट्स सांगणार आहोत.
LIC IPO
LIC IPOesakal
Summary

आज आम्ही LIC आयपीओबद्दल काही पॉझिटीव्ह-नेगिटीव्ह पॉईंट्स सांगणार आहोत.

LIC IPO : सरकार गेल्या दोन वर्षांपासून तयारी करत आहे, त्या LIC चा IPO अखेर सबस्क्रिप्शनसाठी काहीच दिवसात खुला होणार आहे. शेअर बाजारातील लोकांसाठी हा दिवस सणापेक्षा कमी नसेल. भारतातील सर्वात मोठा IPO मार्चच्या मध्यात येत आहे. आज आम्ही LIC आयपीओबद्दल काही पॉझिटीव्ह-नेगिटीव्ह पॉईंट्स सांगणार आहोत.

LIC IPO
LIC IPO मध्ये गुंतवणूकीसाठी SBI च्या YONO वर डीमॅट खाते कसे उघडायचे?

पॉझिटीव्ह पॉईंट्स

1. मोठी कंपनी

भारतातील प्रत्येक 4 पैकी 3 जीवन विमा पॉलिसी LIC द्वारे विकल्या जातात. ही भारतातील सर्वात मोठी आणि जगातील पाचवी सर्वात मोठी विमा कंपनी आहे. प्रीमियमच्या बाबतीत कंपनीचा बाजारातील हिस्सा 64 टक्के आहे. कंपनीकडे 13.4 लाख विमा एजंट्स आहेत.

2. सर्वोत्तम गुंतवणूक

LIC सुमारे 39 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मॅनेजमेंट करते, जे संपूर्ण म्युच्युअल फंड उद्योगाच्या (mutual fund industry) व्यवस्थापनापेक्षा जास्त आहे. ही रक्कम भारताच्या आर्थिक वर्ष 22 च्या एकूण जीडीपीच्या 18.5 टक्के आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत, NSE च्या एकूण बाजार भांडवलात LIC चा वाटा सुमारे 4 टक्के होता.

3. प्रचंड मोठे नेटवर्क

कॉर्पोरेशनकडे 13.4 विमा एजंट, 3,400 एक्टिव्ह मायक्रो इन्शुरन्स एजंट आणि 72 बँकअशुरन्स पार्टनर्सचे मोठे नेटवर्क आहे. सप्टेंबर 2021 पर्यंतच्या 28.25 कोटी एक्टिव्ह पॉलिसींवरून LIC ब्रँडवरील विश्वासाचा अंदाज लावला जाऊ शकतो.

LIC IPO
LIC च्या IPO साठी सरकारने लॉ कंपन्यांकडून दुसऱ्यांदा मागवले RFP

नेगिटिव्ह पॉईंट्स

1. कमी पर्सिस्टन्सी रेशो ( Low Persistency Ratio)

एलआयसीचा प्रवेश चांगला असला तरी ती खासगी कंपन्यांमुळे तिचा मार्केट शेयर गमावत आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीत, 13व्या महिन्यात 78.8 टक्के, 25व्या महिन्यात 70.9 टक्के आणि 61व्या महिन्यात 60.6 टक्के अशी आकडेवारी आहे, जी पर्सिस्टन्सी रेश्योमध्ये होणारी घट दर्शवत आहे. एलआयसीच्या तुलनेच खासगी कंपन्यांचे हेच आकडे जास्त चांगले आहेत

2. कर्जासाठी वापर

आर्थिक संकटामुळे एखादी वित्तीय कंपनी दिवाळखोरीत निघाली, तर तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकार LIC चा वापर करते. IDBI बँकेतील 51 टक्के भागभांडवल 21,600 कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर, LIC ने त्यात 4,743 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

3. वीएनबी मार्जिन कमी

LIC चे वीएनबी मार्जिन (value of the new business) त्याच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत फार चांगले नाही. आर्थिक वर्ष 2021 साठी LIC चे VNB मार्जिन 9.9 टक्के होते, जे आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीत 9.3 टक्के होते. तर त्याचवेळी LIC च्या स्पर्धक कंपन्यांचे VNB मार्जिन 20-25 टक्के आहे.

LIC IPO
LIC चा सेबीकडे IPOसाठी अर्ज! मार्चपर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा

तुम्ही एलआयसी आयपीओसाठी सब्सक्राइब करावे का ?

तेजी मंडीच्या वैभव अग्रवाल यांनी एलआयसीच्या IPO पासून दूर राहण्याची शिफारस केली आहे. कारण एलआयसीच्या तुलनेत इतर लिस्टेड कंपन्यांचे मेट्रिक्स चांगले आहेत. एलआयसी पीयर्समुळे स्वतःचा मार्केट शेअर गमावत आहे. कंपनी तिच्या मजबूत एजंट बेसचा फायदा घेऊ शकत नाही ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही असे अग्रवाल म्हणाले.

अनेक पॉलिसीधारकांनी डिमॅट खाती उघडली असल्याने सबस्क्रिप्शन चांगले असेल, पण इंडिविज्युअल इनवेस्टर्सचा सहभाग कमी असू शकतो असा अंदाज आहे. याच आधारावर, एलआयसी लिस्टिंगवर प्रीमियम व्हॅल्युएशन मिळवू शकत नाही असेही अग्रवाल म्हणाले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com