esakal | LIC Plan | एकदा प्रीमियम भरल्यावर आयुष्यभर दरमहा 12000 रुपये!
sakal

बोलून बातमी शोधा

lic.

LIC Plan |एकदा प्रीमियम भरल्यावर आयुष्यभर दरमहा 12000 रुपये!

sakal_logo
By
ओमकार वाबळे

जर तुम्ही पेन्शन योजना घेण्याचा विचार करत असाल, तर भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आलं आहे. ही पॉलिसी घेताना, तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. या पॉलिसीचे नाव सरल पेन्शन योजना आहे. एलआयसीने 1 जुलैपासून सरल पेन्शन योजना सुरू केली आहे, जी एकच प्रीमियम योजना आहे. याचा अर्थ असा की ही योजना खरेदी करताना तुम्हाला फक्त एकदाच पूर्ण प्रीमियम भरावा लागेल.

सरल पेन्शन योजना ही एक नॉन-लिंक, नॉन-पार्टिसिपिंग आणि सिंगल प्रीमियम अॅन्युइटी प्लॅन आहे. याद्वारे पॉलिसीधारकाला पेन्शन निवडण्याचा पर्याय लगेच उपलब्ध असतो. LIC ने भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात IRDAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सरल पेन्शन योजना सुरू केली आहे.

सरल पेन्शन योजना घेण्याचे 2 मार्ग:

एलआयसी सरल पेन्शन योजना दोन पद्धतींची आहे. प्रथम खरेदीचा किंमत 100% परतावा मिळतो.

सिंगल पॉलिसी : यामध्ये, पॉलिसी कोणत्याही एकाच्या नावावर असेल. म्हणजेच ही पेन्शन योजना कोणत्याही एका व्यक्तीशी जोडली जाईल. जोपर्यंत निवृत्तीवेतनधारक जिवंत आहेत, त्यांना पेन्शन मिळत राहील. त्यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.

संयुक्त पॉलिसी : या योजनेत पती -पत्नी दोघांनाही कव्हरेज आहे. यामध्ये, जो जास्त काळ आयुष्य व्यतीत करेल, त्याला पेन्शन मिळते. जेव्हा दोघांचंही निधन होईल, तेव्हा नामनिर्देशित व्यक्तीला मूळ किंमत मिळेल.

सरल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये

१. विमाधारकासाठी पॉलिसी घेताच त्याचे पेन्शन सुरू होईल.

२. आता हे तुमच्यावर अवलंबून असेल की तुम्हाला दरमहा किंवा तिमाहीत पेन्शन हवी आहे, अर्धवार्षिक किंवा वार्षिक तुम्हाला हा पर्याय स्वतः निवडावा लागेल.

३. ही पेन्शन योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे घेता येते.

४. या योजनेमध्ये किमान 12000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

५. ही योजना 40 ते 80 वर्षांच्या लोकांसाठी आहे.

६. या योजनेत, पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही कर्ज मिळेल.

loading image
go to top