तुमचा हेल्थ इन्शुरन्स क्लेम कंपनीने नाकारला, तर येथे करा तक्रार

HEALTH INSURANCE
HEALTH INSURANCEGoogle

आरोग्य विमा Health Insurance पॉलिसीमध्ये कोणतीही मेडिकल इमरजेंसीच्या काळात उपचारांच्या मोठ्या खर्चासाठी आर्थिक मदत होते. जर रुग्णाची कागदपत्रे पूर्ण असतील तर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी क्लेम Health Insurance Policy Claim करण्यात काहीच हरकत नाही. परंतु, आरोग्य विमा कंपनीकडून अनेकदा हा क्लेम फेटाळला जातो, अशा परिस्थितीत रुग्णाची तसेच नातेवाईकांची चिंता वाढते. बऱ्याचदा लहान त्रुटींमुळे हा क्लेम फेटाळला जातो. अशा प्रसंगी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (know-where-to-complain-if-health-insurance-company-rejects-your-claim)

कोरोना (Coronavirus) महामारीच्या काळात बऱ्याच जणांना दवाखाण्यात दाखल व्हावे लागले या संकटाच्या काळत वीमा कव्हर बऱ्याच जणांसाठी अत्यंत उपयोगी ठरले. पण जेव्हा आरोग्य विमा कंपन्यांकडून शेवटच्या क्षणी रुग्णांचे वीमा दावे नाकारले जातात. कोणतीही विम्याची रक्कम 30 दिवसांच्या आत प्राप्त झाली पाहिजे. जर तसे झाले नाही तर अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यां ठिकाणी तक्रार केली जाऊ शकते. सुरुवातीला याची तक्रार कंपनीच्या विमा हक्क तक्रार विभागात केली जाऊ शकते. तेथून योग्य उत्तर न मिळाल्यास विमा लोकपालकडे तक्रार केली जाऊ शकते आणि तोडगा काढला जाऊ शकतो. तेथे केलेल्या कारवाईबाबत आपण समाधानी नसल्यास आपण उच्च न्यायालयात देखील जाऊ शकता.

आपला हेल्थ इन्शुरन्स क्लेम अडचणीच्या वेळी नाकारला जाऊ नये म्हणून आपल्याला काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सर्व प्रथम हे लक्षात घ्या की विमा घेताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नका. तुम्हाला असलेल्या सर्व आजारांविषयी योग्य माहिती द्या. तसेच वीमा प्रीमियम वेळेवर भरत राह. वीमा घेताना देण्यात आलेल्या अटी व शर्ती पूर्णपणे वाचा यामध्ये कोणते रोग कव्हरेजच्या बाहेर आहेत हे चांगल्या प्रकारे समजून घ्या.

HEALTH INSURANCE
Mirae Asset ने बँकांमध्ये स्टेक वाढवला, HDFC बँक, ICICI मध्ये जास्त भागीदारी

आपला हेल्थ इन्शुरन्स दावा अडचणीच्या वेळी नाकारला जाऊ नये. हे टाळण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सर्व प्रथम, हे लक्षात घ्या की विमा घेताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नका. कृपया पूर्व अस्तित्वातील रोगांविषयी माहिती द्या. प्रीमियम वेळेवर द्या. कृपया अटी व शर्ती पूर्णपणे वाचा. कोणते रोग कव्हरेजच्या बाहेर आहेत हे चांगल्या प्रकारे समजून घ्या.

सर्व गोष्टींची काळजी घेत असूनही, तुमचा दावा काही प्रमाणात किंवा पूर्णपणे नाकारला गेला असेल तर सर्वप्रथम आपले म्हणणे विमा कंपनीच्या तक्रार कक्षात मांडा. तेथून 15 दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास आयआरडीएकडे (IRDA) तक्रार करा. आयआरडीए ही देशातील विमा क्षेत्राची सर्वात मोठी नियामक संस्था आहे. आपण आयआरडीएच्या टोल फ्री क्रमांकावर 155255 किंवा 1800 4254 732 वर देखील तक्रार करू शकता. यासह आयआरडीएच्या तक्रारीसाठी @irdai.gov.in वर ईमेल देखील केला जाऊ शकतो.

HEALTH INSURANCE
आयडीबीआयला खासगीकरणाची मात्रा; शेअर्स सहा टक्यांनी वधारला

जर आपला विमा दावा 30 लाख रुपयांपर्यंत असेल आणि आयआरडीएकडे तक्रारी करुनही काहीही झाले नाही, तर आपण विमा लोकपालकडे संपर्क साधू शकता. लोकपाल विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो. लोकपाल तुम्ही केलेल्या क्लेमच्या आधारने मिळणारी रक्कम निश्चित करतो. जर वीमाधारक व्यक्ती क्लेम रकमेस सहमत असेल तर ऑर्डर पास होईल आणि कंपनीने 15 दिवसांच्या आत त्याचे पालन करावे लागेल. जर मध्यस्थिने काम झाले नाही तर लोकपाल एकतर्फी आदेश देऊ शकतो आणि कंपनीला 30 दिवसांच्या आत त्या आदेशाचे पालन करावे लागते.

(know-where-to-complain-if-health-insurance-company-rejects-your-claim)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com