esakal | कोटक बँकेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात
sakal

बोलून बातमी शोधा

Kotak-Mahindra

कोटक महिंद्रा बँकेने कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतन २५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्याच वेतनात कपात केली जाणार असून वेतन कपात मे महिन्यापासून लागू करण्यात आली आहे.

कोटक बँकेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात

sakal_logo
By
पीटीआय

* बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० टक्क्यांची कपात
* वार्षिक वेतन २५ लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्यांच्या वेतनात कपात नाही
* बँकेचे अध्यक्ष उदय कोटक यांनी यावर्षी फक्त १ रुपयांचे वेतन घेणार 

कोटक महिंद्रा बँकेने कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतन २५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्याच वेतनात कपात केली जाणार असून वेतन कपात मे महिन्यापासून लागू करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बँकेने कर्मचाऱ्यांना ई -मेल द्वारे ही माहिती दिली असून ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतन २५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्या वेतनात कोणतीही कपात होणार नसल्याचे म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या ई मेलमध्ये कोरोनामुळे अर्थव्यवस्था संकट सापडली असल्याचे म्हणत त्याचा कंपनीच्या आर्थिक बाबींवर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बँकेच्या सुनिश्चिततेसाठी बँकेच्या खर्च आणि ऑपरेशन्सचा आढावा घेणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देताना नोकऱ्यांना संरक्षण देणे कंपनीपुढील मुख्य उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे.

'एसबीआय'ची कर्जदारांना गुड न्यूज; वाचा सविस्तर बातमी

या अगोदर एप्रिल महिन्यात बँकेच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी १५ टक्के वेतन कपात घेण्याचा निर्णय घेतला होता. तर बँकेचे अध्यक्ष उदय कोटक यांनी यावर्षी फक्त १ रुपयांचे वेतन घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

कोटक महिंद्रा बॅंक ही देशातील आघाडीची खासगी क्षेत्रातील बॅंक आहे.

loading image
go to top