'एसबीआय'ची कर्जदारांना गुड न्यूज; वाचा सविस्तर बातमी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

नवे व्याजदर येत्या 10 मेपासून लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे गृह, वाहन तसेच इतर प्रकराची कर्जे स्वस्त होतील. बँकेकडून सलग बारा वेळा एमसीएलआर दरात कपात करण्यात आली आहे. या अगोदर मार्च महिन्यात देखील एमसीएलआर दरात 0.10 ते 0.15 टक्क्याची कपात करण्यात आली होती. या कपातीनंतर एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता 7.40 टक्क्यांवरून 7.25 टक्के झाला आहे. सर्व मुदतीच्या कर्जाच्या दरात 0.15 टक्क्याची कपात करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्सवर आधारित कर्ज दरात (एमसीएलआर) 0.15 टक्क्याची कपात केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नवे व्याजदर येत्या 10 मेपासून लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे गृह, वाहन तसेच इतर प्रकराची कर्जे स्वस्त होतील. बँकेकडून सलग बारा वेळा एमसीएलआर दरात कपात करण्यात आली आहे. या अगोदर मार्च महिन्यात देखील एमसीएलआर दरात 0.10 ते 0.15 टक्क्याची कपात करण्यात आली होती. या कपातीनंतर एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता 7.40 टक्क्यांवरून 7.25 टक्के झाला आहे. सर्व मुदतीच्या कर्जाच्या दरात 0.15 टक्क्याची कपात करण्यात आली आहे.

अमेरिकेतील विमान कंपन्यांना झाला तब्बल एवढ्या डॉलरचा तोटा; किती ते वाचा

किती ईएमआय कमी होणार?
ग्राहकाने 30 वर्षांच्या कालावधीसाठी 25 लाख रुपये गृहकर्ज घेतले असल्यास ग्राहकाचा ईएमआय 255 रुपयांनी कमी होणार आहे.

ठेवीदारांना फटका
बँकेने किरकोळ ठेवींच्या व्याजदरात देखील 0.20 टक्क्याची कपात केली आहे. त्यामुळे ठेवींच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्या ग्राहकांना मात्र फटका बसणार आहे. दरम्यान बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी 'वीकेअर डिपॉझिट' नावाने योजना आणली आहे. त्यात पाच वर्षांच्या ठेवींवर अतिरिक्त 0.30 टक्के व्याज मिळणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state bank of india reduces interest rates