esakal | 'कोटक महिंद्रा' विकणार भारती एंटरप्रायजेसला 'एअरटेल'चे 20 कोटी शेअर्स
sakal

बोलून बातमी शोधा

'कोटक महिंद्रा' विकणार भारती एंटरप्रायजेसला 'एअरटेल'चे 20 कोटी शेअर्स

'कोटक महिंद्रा' विकणार भारती एंटरप्रायजेसला 'एअरटेल'चे 20 कोटी शेअर्स

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- शिल्पा गुजर

एअरटेल पेमेंट्स बँकेत (Airtel Payments Bank - APBL) असलेले 20 कोटी शेअर्स भारती एंटरप्रायजेस लिमिटेडला (Bharti Enterprises Ltd) 294 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीने विकणार असल्याचे भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी कोटक महिंद्रा बँकेने (Kotak Mahindra Bank) सांगितले.

हेही वाचा: CarTrade शेअर्स लिस्टिंगच्याच दिवशी 9 टक्क्यांनी घसरले

एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये असलेले 20,00,00,000 इक्विटी शेअर्स भारती एंटरप्रायजेस लिमिटेडला विकण्यासाठी कोटक महिंद्रा बँक लिमिटेड बँकेने शेअर खरेदी करार केला आहे. कोटक महिंद्राने एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती देण्यात आली. 2016 ते 2017 दरम्यान हप्त्यांमध्ये 200 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे हे शेअर्स विकत घेण्यात आले होते. ही विक्री 15 सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: SBI चे शेअर्स आता खरेदी करणे योग्य की अयोग्य ?

या प्रस्तावित व्यवहारासाठी कोणत्याही सरकार किंवा नियामकाकडून (regulatory) मान्यता घेण्याची गरज नाही, असेही बँकेने म्हटले आहे. प्रस्तावित व्यवहार पुढे नेण्यासाठी भारती एंटरप्रायजेसला आरबीआयकडून (RBI) ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

हेही वाचा: 'हे' हेवीवेट शेअर्स पुढेही देणार तगडा परतावा, ब्रोकर हाऊसेसने सुचवलेले शेअर्स

1 एप्रिल 2010 रोजी पेमेंट बँकांसाठी आरबीआय परवान्यात एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेडचा (ABPL) समावेश करण्यात आला होता. एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेडने (ABPL) 23 नोव्हेंबर 2016 पासून पेमेंट बँक म्हणून आपला व्यवसाय सुरू केला. 2019-20 या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल 627.19 कोटी रुपये होती.

हेही वाचा: Share Market: निर्देशांक विक्रमी उंचीवर; अदानी शेअर्स नरम गरम

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top