सॉव्हरिन गोल्ड बॉंडची सुवर्णसंधी! 

लक्ष्मीकांत श्रोत्री 
Monday, 6 July 2020

तुमच्या गुंतवणुकीचा काही भाग हा सोन्यामध्ये असणे आवश्‍यक आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याची पारंपरिक पद्धत म्हणजे शुभमूहूर्तावर सराफांकडे जाऊन सोन्याची वेढणी किंवा दागिने विकत घ्यायचे.

आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सोन्याचे महत्त्व आहे. जसे सोने आपल्या आयुष्याबरोबर जोडले गेले आहे, तसेच ते आपल्या गुंतवणुकीचा पूर्वापारपासून चालत आलेला अविभाज्य पर्यायदेखील आहे. आजही सोन्याचे गुंतवणुकीतील महत्त्व इंचभरसुद्धा कमी झालेले नाही. तुमच्या गुंतवणुकीचा काही भाग हा सोन्यामध्ये असणे आवश्‍यक आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याची पारंपरिक पद्धत म्हणजे शुभमूहूर्तावर सराफांकडे जाऊन सोन्याची वेढणी किंवा दागिने विकत घ्यायचे. नंतर ते लॉकरमध्ये जपून ठेवायचे. अशा पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीमध्ये काही गोष्टी अडचणीच्या ठरत होत्या. त्यामध्ये सोने सांभाळण्याची जोखीम असायची. विकत घेतलेले सोने किती शुद्ध आहे, याची खात्री नसायची. या गुंतवणुकीपासून नियमित असे उत्पन्न नसायचे. विकतानाचा भाव वेगळा असतो, शिवाय घट धरल्याने कमी पैसे मिळत. विकून झालेल्या नफ्यावर भांडवली लाभ कर (कॅपिटल गेन टॅक्‍स) भरावा लागत असे. म्हणजे आपण गुंतवणूक केलेल्या सोन्याच्या भावात जरी वाढ झालेली असली तरी आपल्याला मिळणारा परतावा कमी असायचा. या सर्वांवर उपाय म्हणजे केंद्र सरकार पुरस्कृत सॉव्हरिन गोल्ड बॉंड! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

गोल्ड बॉंडची वैशिष्ट्ये 
- केंद्र सरकार पुरस्कृत म्हणजे 100 टक्के सुरक्षित 
- सोने सांभाळण्याची जोखीम नाही. 
- सोने चोरीला जाण्याची भीती नाही. 
- शुद्धतेची संपूर्ण खात्री, खरे तर हा प्रश्नच येत नाही. 
- गुंतवणुकीपासून नियमित उत्पन्न. 

कसा घेता येतो हा बॉंड? 
- प्रत्येक बॉंड हा एका ग्रॅमचा असेल. 
- कमीत कमी एक ग्रॅम आणि जास्तीतजास्त चार किलो. 
- ज्या किमतीला बॉंड दिले आहेत, त्यावर वार्षिक 2.5 टक्के व्याज. 
- व्याजाची रक्कम वर्षातून निम्मी-निम्मी दोनदा मिळणार. 
- गुंतवणूक करणाऱ्याला बॉंड विकत घेतल्याचे प्रमाणपत्र मिळेल. 
- डीमॅटमध्येही बॉंड ठेवण्याची सोय. 
- वारस नेमण्याची (नॉमिनेशन) सोय. 
- बॉंडचा कालावधी आठ वर्षे 

गोल्ड बॉंडची किंमत 
- जुलैमधील गोल्ड बॉंड इश्‍यूची किंमत ः प्रति ग्रॅम ..... रुपये. 
- ऑनलाइन गुंतवणूक केल्यास इश्‍यू प्राइसमध्ये 50 रुपयांची सवलत. 
- बॉंडची किंमत ही एक आठवड्याआधीच्या शेवटच्या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या सोन्याच्या किमतीच्या सरासरीवरून ठरते. 
- आठ वर्षांनंतर पैसे परत मिळताना, बॉंडची किंमत ही मुदतपूर्तीच्या तारखेच्या एक आठवड्याआधीच्या शेवटच्या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या सोन्याच्या किमतीची सरासरीवरून ठरणार. 
- मुदतपूर्तीची रक्कम आणि व्याज हे थेट बॅंक खात्यात जमा होणार. 

हेही  वाचा : 'टॅक्स' वाचवणारे चार मित्र

बॉंडमधून बाहेर पडण्याचा पर्याय 
- इश्‍यू डेटपासून पाच वर्षांनी बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध. 
- हे बॉंड भेट म्हणून किंवा दुसऱ्याच्या नावावर वर्ग करण्याचा पर्याय उपलब्ध. 
- हे बॉंड तारण ठेऊन कर्ज काढणे शक्‍य. 
- बॉंड प्रचलित एक्‍स्चेंजवर विकण्याची सोय उपलब्ध. 

गोल्ड बॉंड आणि कर 
- बॉंडवर मिळणारे व्याज करपात्र. 
- बॉंडमधील गुंतवणूक पूर्ण आठ वर्षे ठेवली तर भांडवली लाभ कर भरावा लागत नाही. 
- जर बॉंड आठ वर्षांआधी विकले तर इंडेक्‍सेशन करून भांडवली लाभ कर भरावा लागेल. 
- व्याज आणि मुदतीनंतर मिळणाऱ्या पैशातून उद्‌गम करकपात (टीडीएस) केली जात नाही. 

जोखीम काय आहे? 
- सोन्याचे भाव हे स्थिर नसतात. म्हणजे ते कमी किंवा जास्त होतात. या बॉंडच्या मुदतपूर्तीच्या वेळी किंवा तुम्ही विकताना सोन्याचा भाव तुम्ही विकत घेताना असलेल्या भावापेक्षा कमी असेल तर तुम्हाला भांडवली तोटा होऊ शकतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कधी मिळतील गोल्ड बॉंड? 
- येत्या 6 ते 10 जुलै 2020 दरम्यान 
- पुढील महिन्यात 3 ते 7 ऑगस्ट 2020 दरम्यान 
- नंतर 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2020 दरम्यान 

(लेखक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर - सीएफपी आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: laxmikant shrotri writes article about sovereign Gold Bond Golden Opportunity