esakal | LIC ने खुल्या बाजारातून BOI मध्ये घेतला 4% हिस्सा; बँकेच्या शेअर्सवर काय होणार परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

share market

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (LIC) बँक ऑफ इंडिया (Bank Of India) मधील 4% हिस्सा खुल्या बाजारातून खरेदी केला आहे.

LIC ने खुल्या बाजारातून BOI मध्ये घेतला 4% हिस्सा; शेअर्सवर काय होणार परिणाम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- शिल्पा गुजर

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (LIC) बँक ऑफ इंडिया (Bank Of India) मधील 4% हिस्सा खुल्या बाजारातून खरेदी केला आहे. बँक ऑफ इंडियाने ही माहिती दिली. एलआयसीने 2 सप्टेंबर रोजी खुल्या बाजारातून बँक ऑफ इंडियामध्ये 3.9 टक्के म्हणजेच 15,90,07,791 शेअर्स घेतले आहेत. नवीन हिस्सा घेण्यापूर्वी एलआयसीचा बँक ऑफ इंडियामध्ये 3.17 टक्के हिस्सा होता. बँक ऑफ इंडियाचे (Bank Of India) शेअर्स 3 सप्टेंबर रोजी 0.59 टक्क्यांनी घसरून 59.25 रुपयांवर बंद झाले.

एलआयसीचा बँक ऑफ इंडियातील हिस्सा आता 7.05 टक्क्यांपर्यंत वाढल्याची माहिती बँक ऑफ इंडियाने दिली. सेबीच्या नियमांनुसार, एखाद्या कंपनीत कोणाचा 5 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा असेल, तर त्याची माहिती एक्स्चेंजला देणे अनिवार्य आहे.

हेही वाचा: LIC : दिवसाला करा 200 रुपयांची बचत, मॅच्युरीटी नंतर मिळवा 28 लाख

बँक ऑफ इंडियाने अलीकडेच पात्र संस्थात्मक (Qualified Institutional) प्लेसमेंटद्वारे गुंतवणूकदारांकडून 2,550 कोटी रुपये जमा केले आहेत. भांडवल समस्या (Capital Issue) समितीची बैठक 31 ऑगस्ट रोजी झाल्याचे बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (Qualified Institutioanal Buyers) 40,54,71,866 इक्विटी शेअर्स देण्यास मान्यता दिली. बँक ऑफ इंडियाने प्रति शेअर 62.89 रुपये दराने शेअर्स जारी करून 2.550.01 कोटी रुपये जमा केले होते.

बँकेचा आयपीओ 25 ऑगस्ट रोजी आला आणि 30 ऑगस्ट रोजी बंद झाला. यापूर्वी बँकेने या आयपीओमधून 3000 कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले होते.

loading image
go to top