LIC ग्राहकांसाठी सुवर्ण संधी! Lapsed Policies आता पुन्हा सुरू करता येणार, जाणून घ्या माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LIC gave golden apportunity to Policy holders

LIC ग्राहकांसाठी सुवर्ण संधी! Lapsed Policies आता पुन्हा सुरू करता येणार, जाणून घ्या माहिती

भारतीय जीवन वीमा निगम (LIC) ग्राहकांसाठी सुवर्ण संधी घेऊन येतेय. त्यासाठी LICने नवे अभियान सुरू केले आहे. ज्यामुळे लॅप्स झालेल्या पॉलिसीज ग्राहकांना पुन्हा सुरू करता येणार आहे. हे अभियान बुधवारपासून सुरू झाले असून काही ठराविक कालावधीपर्यंत LIC कडून हे अभियान चालवण्यात येणार आहे. (LIC gave golden apportunity to Policy holders)

२१ ऑक्टोबरपर्यंत असेल मुदत

एलआयसीकडून मंगळवारी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार ULIP वगळता सगळ्याच पॉलिसिजला विशेष कँपेन अंतर्गत लेट फीस (Late Fees)सह चालू केल्या जाऊ शकतं. कँपेन अंतर्गत या लेट फीसमध्ये पॉलिसीधारकांना सूटही दिली जाणार आहे. देशातील सर्वात मोठ्या वीमा कंपनीकडून सांगण्यात आलंय की हे अभियान १७ ऑगस्टपासून २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सुरू राहाणार आहे.

या पॉलिसीजमध्ये १०० टक्के सूट

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, LIC कडून सांगितल्या गेलंय की (Micro Insurance Policies) ग्राहकांना लेट फीससाठी १०० टक्के सूट मिळणार आहे. माहितीसाठी ULIP वगळता सगळ्या पॉलिसीजचा पहिला प्रिमीयम चुकल्याच्या तारखेपासून ५ वर्षाच्या कालावधीमध्ये काही अटींवर ग्राहक पॉलिसी परत सुरू करू शकतात.

अभियान सुरू करण्याचंही महत्वाचं कारण

LICने अशा पॉलिसी धारकांसाठी हे अभियान सुरू केले आहे जे काही कारणास्तव प्रिमियम पेमेंट करू शकले नाहीत. आणि त्यामुळे त्यांची वीमा पॉलिसी बंदी झालेली. कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती जारी केली आहे. LIC कडून केलेल्या ट्विट मध्ये सांगितल्या गेलंय की लॅप्स पॉलिसी होल्डर्सला त्यांच्या पॉलिसीज सुरू करण्याची संधी मिळणार आहे.

प्रिमियमवर मिळणार एवढी सूट

LIC नुसार या अभियानाअंतर्गत पॉलिसीहोल्डर्सला १ लाख रुपयांपर्यंत प्रिमियममध्ये २५ टक्क्यांपर्यंत सुट दिली जाईल. या सूटची फीस २५०० रुपये राहील. याव्यतिरीक्त १ ते ३ लाख प्रिमियमसाठी ३००० हजार रुपये सूट दिली जाईल.