LIC IPO 'या' तारखेला लॉंच होण्याची शक्यता; सूत्रांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LIC IPO

LIC IPO 'या' तारखेला लॉंच होण्याची शक्यता; सूत्रांची माहिती

नवी दिल्ली : लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या बहुप्रतिक्षित इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO) ४ मे रोजी लॉंच केला जाऊ शकतो. मात्र या IPO ची नेमकी तारीख 27 एप्रिलनंतरच कळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एलआयसीचा आयपीओ ४ मे रोजी उघडू शकतो आणि तो ९ मे रोजी बंद होऊ शकतो. मात्र आयपीओ उघडण्याच्या तारखेसह, त्याच्या समाप्तीची खरी तारीख याबाबतचा योग्य अंदाज २७ एप्रिलनंतरच कळेल असे सुत्रांनी सांगितले आहे.

एलआयसीने आपल्या IPOचा आकार आधीच 5 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. असे सूत्रांनी सांगितले. तर मसुद्यात सरकारने 5 टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव दिला होता. सरकार आता LIC मधील 3.5 टक्के शेअर्स विकणार आहे, ज्यातून 21,000 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. मसुद्यानुसार, सरकार एलआयसीच्या पाच टक्के इक्विटी विकणार आहे. या अंतर्गत एलआयसीचे बाजार मूल्य 6 लाख कोटी रुपये अंदाजित होते. यापूर्वी सरकारने एलआयसीचे बाजारमूल्य सुमारे 17 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

हेही वाचा: "लाथ मारायची आणि सॉरी म्हणायचं .."; चंद्रकांत पाटलांची सरकारवर टीका

LIC ही 66 वर्षे जुनी विमा कंपनी आहे. त्यांच्याकडे 28 कोटींहून अधिक पॉलिसी आहेत. ही जगातील 5 व्या सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक आहे, हा अंदाज 2020 च्या आकडेवारीवर आधारित आहे.

हेही वाचा: 'पाकिस्तानात म्हणण्यात हरकत काय?'; हनुमान चालिसावरून कॉंग्रेसचा मोदींवर निशाणा

Web Title: Lic Ipo May Open On May 4 But Exact Timelines Post April 27 Says Sources

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :LICLIC IPO
go to top