
LIC Service : LIC ची मोठी घोषणा; ग्राहकांसाठी करणार 'हा' बदल
LIC Whatsapp Service Registration : देशातील सर्वात मोठी सरकारी जीवन विमा कंपनी एलआयसीने ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. एलआयसीने व्हॉट्स अॅप सेवा सुरू केली आहे. ही नवीन सेवा सुरू झाल्याने ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. आता लोकांना प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी एलआयसी कार्यालयात जावे लागणार नाही. तसेच तुम्हाला एलआयसी एजंटची गरज भासणार नाही.
हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
तुमच्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला या मोबाईल नंबर- 8976862090 वर व्हॉट्स अॅपद्वारे 'हाय' (hi) असा मेजेज पाठवावा लागेल, ज्याद्वारे तुम्ही अनेक प्रकारच्या सेवा वापरू शकता. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. यामध्ये तुम्हाला प्रीमियम देय, बोनस माहिती, पॉलिसी स्थिती, कर्ज पात्रता कोटेशन, कर्ज परतफेडीचे कोटेशन, कर्जाचे व्याज देय, प्रीमियम पेड प्रमाणपत्र, एलआयसी सर्व्हिस लिंक्स या सुविधा मिळतील. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.
एलआयसीने आपल्या दोन नवीन योजना पुन्हा लाँच केल्या आहेत. LIC ने त्याला न्यू जीवन अमर (LIC's New Jeevan Amar), न्यू टेक-टर्म (LIC's New Tech-Term) प्लॅन असे नाव दिले आहे. या संदर्भात एलआयसीने सांगितले की, 3 वर्षांपूर्वी जारी केलेल्या या दोन्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसी योजना आता पुन्हा लाँच करून बाजारात आणल्या गेल्या आहेत. आता तुम्ही या पॉलिसी ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही प्रकारे खरेदी करू शकता.