‘एलआयसी’चे एमडी म्हणून सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 February 2021

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते एलआयसी हाउसिंग फायनान्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होते.

मुंबई - भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते एलआयसी हाउसिंग फायनान्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होते. तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी (सीओओ) म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोहंती यांनी १९८५ मध्ये ‘एलआयसी’मध्ये थेट अधिकारी म्हणून कारकीर्दीस सुरुवात केली. गेल्या तीन दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी या महामंडळाच्या मार्केटिंग, एचआर तसेच इन्व्हेस्टमेंट आणि लिगल अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला आहे. ‘एलआयसी’च्या महाराष्ट्र, गोवा, गुजरात या पश्चिम क्षेत्राबरोबरच, रायपूर व कटक विभागाचे वरिष्ठ विभागीय अधिकारी म्हणूनही काम सांभाळलेले आहे. 

Share Market : बाजारात पुन्हा उसळी; सेन्सेक्स 51 हजाराच्या पार; निफ्टीची ऐतिहासित मजल

मोहंती यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, त्यांच्याकडे कायद्याचीही पदवी आहे. याशिवाय बिझनेस मॅनेजमेंटचेही पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतलेले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LIC MD selected Siddhartha Mohanty