घरबसल्या भरा एलआयसी प्रीमियम, कसा जाणून घ्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरबसल्या भरा एलआयसी प्रीमियम, कसा जाणून घ्या...

घरबसल्या भरा एलआयसी प्रीमियम, कसा जाणून घ्या...

तुम्ही आता एलआयसी प्रीमियम घर बसल्याही भरू शकता, त्यासाठी एलआयसी शाखेत जाण्याची किंवा एजंटला पैसे द्यायची गरज नाही. LIC च्या वेबसाईट व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरूनही सहज पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. LIC प्रीमियमचे पेमेंट ऑनलाइन सबमिट केल्यानंतर, पेमेंट पावती आठवणीने डाउनलोड करुन ठेवा.

हेही वाचा: 'हा' पेपर स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये देईल चांगला परतावा...

आजच्या काळातही असे अनेक लोक आहेत जे एलआयसीच्या शाखेत जाऊन प्रीमियम जमा करतात. पण असे केल्याने तुमचा बराच वेळ वाया जातो. एलआयसी ही भारतातील सर्वात मोठ्या आणि जुन्या विमा कंपन्यांपैकी एक आहे. एलआयसीकडे सर्वाधिक पॉलिसीधारक आहेत. त्यामुळेच प्रीमियम ऑनलाइन जमा करणे हा सोपा मार्ग आहे.

काय आहे प्रोसेस ?

तुम्ही तुमच्या मोबाइलवरून एलआयसी पे डायरेक्ट ऍप ( LIC Pay Direct) डाउनलोड करा आणि यावरुन पॉलिसीचा प्रीमियम जमा करू शकता. याशिवाय कंपनीच्या वेबसाइटवरूनही प्रीमियम जमा करता येईल. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी www.licindia.in या वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला इथे 'पे डायरेक्ट' लिहिलेले दिसेल जिथे तुम्ही लॉगिन न करताही प्रीमियम भरू शकता. मग दुसरे पेज उघडेल जिथे 'please select', 'premium payment' असे लिहिलेले असेल, तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल आणि proceed बटण दाबावे लागेल.

UPI ने भरा एलआयसी प्रिमियम

सध्या अनेक UPI पेमेंट ऍप्स आहेत जिथे एलआयसी प्रीमियम भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. PhonePe, Paytm, Google Pay सारख्या पेमेंट ऍप्सवरुन LIC प्रीमियम भरला जाऊ शकतो.

प्रीमियम पेमेंट कसे तपासाल ?

- एलआयसी वेबसाइट https://www.licindia.in/ वर जा.

- तुमचे नाव, पॉलिसी क्रमांक इत्यादी टाकून रजिस्ट्रेशन करा.

- एकदा नोंदणी केल्यानंतर, तुम्ही कधीही पॉलिसीचे स्टेटस ऑनलाइन तपासू शकता.

- 022-68276827 या क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळवू शकता.

- 9222492224 क्रमांकावर LICHELP <पॉलिसी नंबर> लिहून मेसेज पाठवा, हा मेसेज पाठवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

हेही वाचा: शेअर बाजारात अस्थिरता, Banking अन् IT शेअर्सवर दबाव

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Lic Premium Payment Follow These Step

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Arthavishwalic policy