शेअर बाजारात अस्थिरता, Banking अन् IT शेअर्सवर दबाव

दिवसभर शेअर बाजारात अस्थिरता होती
Share Market News Updates
Share Market News Updatesesakal

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण होती मात्र आज या घसरणीला ब्रेक लागला आणि शेअर बाजार तेजीसह सुरू झाला. दिवसभर शेअर बाजारात अस्थिरता होती. अखेर शेवटच्या सत्रात शेअर बाजार हलक्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 8 अंकांनी 53,000 वर बंद झाला तर निफ्टी 18 अंकांनी 15,780 वर बंद झाला. (share market update)

आज दिवसभरात 33 कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर 17 कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. CIPLA, INDUSINDBK, TATACONSUM, BAJAJFINSV, TATAMOTORS, BAJAJ-AUTO या सह 33 कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

Share Market News Updates
शेअर बाजारात अस्थिरता, Banking अन् IT शेअर्सवर दबाव

आज शेअर बाजार हलक्या तेजीसह सुरू झाला. आज शेअर बाजारात अस्थिरता होती मात्र तितकीच गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक होती. सेन्सेक्स 200 अंकाच्या तेजीसह 53,250 वर उघडला तर निफ्टी 49 अंकाच्या तेजीसह 15,850 वर उघडला.

बुधवारी व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 150.48 अंकांनी म्हणजेच 0.28 टक्क्यांनी घसरून 53,026.97 वर बंद झाला होता तर दुसरीकडे, निफ्टी 51.10 अंक म्हणजेच 0.32 टक्क्यांनी घसरून 15,799.10 वर बंद झाला

Share Market News Updates
FASTag मधील Balance कसा तपासायचा? या चार सोप्या टीप्स फॉलो करा

जून सिरीज एक्स्पायरीपूर्वी शेअर बाजारात दबाव दिसून आला. सेन्सेक्स-निफ्टी लाल चिन्हात बंद झाले. गुरुवारच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, एफएमसीजी शेअर्सवर दबाव होता, तर मेटल, रियल्टी शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाली. दुसरीकडे, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्रीचा दबदबा राहिला. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.70 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप 0.18 टक्क्यांनी घसरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com