Health Insurance | 2022 पासून आयुर्विमा पॉलिसी महागणार, जाणून घ्या नवा प्रीमियम! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Life Insurance Company issues extension up to 15 April

2022 पासून आयुर्विमा पॉलिसी महागणार, जाणून घ्या नवा प्रीमियम!

लाइफ इन्शुरन्स प्रीमियमची रक्कम पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ पासून वाढू शकते. एका अहवालानुसार, आयुर्विमा कंपन्या पुढील वर्षापासून त्यांचे शुल्क वाढवणार आहेत, ज्याचा भार जीवन विमा कंपन्यांकडून त्यांच्या ग्राहकांवर पडू शकतो. 2022 पासून यासंदर्भातील नियम लागू होतील.

जीवन विमा कंपन्यांसाठी पुनर्विमा हा विम्याचा एक मार्ग आहे. जीवन विमा कंपन्या त्यांच्या विविध प्रकारच्या जोखीम कव्हर करण्यासाठी पुनर्विमा कंपन्यांना शुल्क देतात. प्रीमियमची रक्कम (आरोग्य विमा प्रीमियम) वाढवून विमा कंपन्यांचा नफाही वाढू शकतो. पण यामुळे पॉलिसीची मागणी कमी होऊ शकते. विशेषतः अशा वेळी, जेव्हा विमा उत्पादनांबद्दल जागरूकता वाढत आहे. कोरोना काळापासून मोठ्या प्रमाणात विमा पॉलिसी वापरण्याचं प्रमाण वाढलं. अनेकांनी पॉलिसीसाठी अर्ज केले.

प्रीमियम 40 टक्क्यांपर्यंत वाढणार?

विम्याच्या प्रीमियमची रक्कम 20 ते 40 टक्क्यांच्या दरम्यान वाढण्याची शक्यता काही तज्ञांनी वर्तवली आहे. कारण काही काळापासून पुनर्विमा कंपन्यांना जास्त प्रमाणात विम्यावर दावे मिळत असल्याने त्यांचा तोटा वाढला आहे. अशा परिस्थितीत हा तोटा भरून काढण्यासाठी येणाऱ्या काळात कंपन्या हेल्थ पॉलिसीची किंमत देखील वाढवण्याच्या तयारीत आहेत.

अनेक कंपन्यांनी यापूर्वीच भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) कडे शुल्क वाढवण्याची परवानगी मागितली आहे. त्याच वेळी, काही कंपन्या किमान दरवाढ ठेवण्यासाठी जागतिक पुनर्विमा कंपन्यांशी चर्चा करत आहेत. प्रीमियमच्या वाढीमुळे पॉलिसीच्या ऑफलाइन आणि ऑनलाइन विक्रीवर परिणाम होऊ शकतो.

loading image
go to top