कर्जे महागणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मुंबई - किरकोळ, तसेच घाऊक चलनवाढीने जून महिन्यात उच्चांक गाठल्यानंतर सावध झालेल्या रिझर्व्ह बॅंकेने आज रेपोदरात पाव टक्‍क्‍याची वाढ केली. यामुळे रेपोदर ६.५० टक्के झाला आहे. चलनवाढ नियंत्रणासाठी ‘आरबीआय’ची रेपोदरवाढीची मात्रा कर्जदारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. या दरवाढीनंतर बॅंकांकडून नजीकच्या काळात गृहकर्ज, वाहन आणि वैयक्‍तिक कर्जाचा दर वाढवला आहे. जूनमधील पतधोरणात बॅंकेने रेपोदर पाव टक्‍क्‍याने वाढवला होता. ऑक्‍टोबर २०१३ नंतर प्रथमच ‘आरबीआय’ने सलग दोन पतधोरणांत व्याजदर वाढीचा दणका दिला आहे.

सध्या बहुतांश बॅंकांकडून ‘एमसीएलआर’ आकारला जातो. रेपोदरवाढीचा थेट परिणाम बॅंकांवर होईल. बॅंकांकडून जादा दराने रिझर्व्ह बॅंकेकडून कर्ज घ्यावे लागेल, ज्याचा भार ते ग्राहकांवर टाकतील, असे जाणकारांचे मत आहे.

नुकताच काही बॅंकांनी ‘एमसीएलआर’ वाढवला होता. आता सलग दोन पतधोरणांतून रेपोदर अर्धा टक्‍क्‍याने वाढला आहे. त्यामुळे बॅंकांकडून ‘एमसीएलआर’मध्ये किमान पाव टक्‍क्‍याने वाढ होण्याची शक्‍यता आहे. ज्यामुळे गृहकर्जाचा मासिक हप्ता ३० लाख रुपयांच्या कर्जासाठी ४७७ रुपये आणि ७५ लाखांच्या कर्जासाठी एक हजार १९२ रुपयांनी वाढणार आहे. वाहन कर्जाचा दर पाव टक्‍क्‍याने वाढण्याची शक्‍यता आहे. ज्यामुळे ऐन सणासुदीत कर्जदारांचे मासिक बजेट कोलमडणार आहे. 

चलनवाढ आणि अनिश्‍चितता
‘जून’मध्ये किरकोळ चलनवाढ ५ टक्के आणि घाऊक चलनवाढ ५.७७ टक्‍क्‍यांपर्यंत वाढली आहे. सरकारने खरिपासाठी किमान आधारभूत किंमत वाढवली आहे. जागतिक बाजारात अनिश्‍चितेमुळे खनिज तेलाच्या किमतींवर परिणाम होत असल्याने ‘आरबीआय’ने पतधोरणात चिंता व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बॅंकेने चार टक्‍के चलनवाढीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

रेपो दरवाढीचे अनुकरण बॅंकांकडून केले जाईल. नुकताच एसबीआयने ‘एमसीएलआर’ वाढवला होता, आता आणखी इतर बॅंकांकडून व्याजदर वाढवले जातील. ज्यामुळे ‘ईएमआय’चा भार वाढेल.
- आदिल शेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी, बॅंक बझार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loan rate increase repo rate