
प्रत्येक महिन्याला तेल कंपनीकडून आंतरराष्ट्रीय बाजाराचा आढाव घेतल्यानंतर गॅस दरामध्ये बदल करण्यात येत असतो. केंद्रात सत्ताधारी असलेल्या मोदी सरकारच्या काळात दिवसांदिवस गॅस दरात भडका होत आहे.
तेल कंपन्यांनी इंधन दरात केलेल्या बदलाचा परिणाम घरगुती गॅस वापराच्या किंमतीवरही झाला आहे. नव्या इंधन दर वाढीनंतर आता एलपीजी गॅससाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे. 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ झाली आहे. तर पाच किलोच्या गॅसच्या किंमतीच 18 रुपयांनी वाढवल्या आहेत. याशिवाय 19 किलो वजनाच्या भरलेल्या सिलिंडरसाठी आता 36.50 रुपये जास्त मोजावे लागणार आहे.
देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणाऱ्या आयओसीने नव्याने लागू केलेल्या गॅसच्या किंमती या वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या आहेत. दिल्लीमध्ये आता 14.2 किलो वजनाचा गॅस सिलिंडर 644 रुपयांना मिळणार असून मुंबईतील दर हा देखील 644 इतकाच आहे. या दोन राज्याच्या तुलनेत चेन्नई आणि कोलकातामध्ये किंमती अधिक आहेत. याठिकाणी अनुक्रमे 660 आणि 670.50 रुपये दर आहेत.
53 वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडे येणार
प्रत्येक महिन्याला तेल कंपनीकडून आंतरराष्ट्रीय बाजाराचा आढाव घेतल्यानंतर गॅस दरामध्ये बदल करण्यात येत असतो. केंद्रात सत्ताधारी असलेल्या मोदी सरकारच्या काळात दिवसांदिवस गॅस दरात भडका होत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षातून सरकारवर टीका होण्यासही सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे देशातील सामनान्य जनता त्रस्त असताना सरकारने गॅस दरात कपात करुन त्यांना दिलासा देण्याऐवजी इंधन दरात वाढ करत आहे. अशी टीका विरोधी पक्षाकडून सुरु झाली आहे. या दरवाढीविरोधात विरोधक पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठीच प्रयत्नशील असतील.