esakal | 53 वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडे येणार
sakal

बोलून बातमी शोधा

Air India

मोदी सरकारने 2018 मध्येच एअर इंडिया कंपनी विकण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी कंपनी खरेदी करण्यासाठी कोणतीच उत्सुकता दाखवली नाही. आता अनेक कंपन्या एअर इंडिया खरेदीसाठी सकारात्मक असल्याचे चित्र आहे.

53 वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडे येणार

sakal_logo
By
ऑनलाईन सकाळ

नवी दिल्ली : उद्योग क्षेत्रातील देशातील विश्वसनीय टाटा समुहाने संकटात असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडिया खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी टाटा समुहाने मागील आठवड्यातच प्रस्ताव (expression of interest) दिला आहे. ही डील पक्की झाली तर एअर इंडियाची 53 वर्षानंतर  घरवापसी होईल. टाटाने यासाठी एअर एशियाचा उपयोग केल्याचे बालले जात आहे. यात टाटा सन्सची हिस्सेदारी आहे.  

मोदी सरकारने 2018 मध्येच एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाचा प्रयत्न सुरु केला होता. पण त्यावेळी कंपनी खरेदी करण्यासाठी कोणतीच उत्सुकता दाखवली नाही. आता अनेक कंपन्या एअर इंडिया खरेदीसाठी सकारात्मक असल्याचे चित्र आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी एअर इंडियाचे खासगीकरण केले नाही तर कंपनी  एअर इंडियाचे खासगीकरण ही एक गोपनिय प्रक्रिया आहे. यासंदर्भातील माहिती योग्य वेळी दिली जाईल, असे राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी रविवारी म्हटले होते. 

गोल्ड म्युच्युअल फंडातील सुवर्णसंधी

1932 मध्ये टाटा एअरलाइन्सच्या नावाने एअर इंडियाची सुरुवात करण्यात आली होती. टाटा एअरवेज या भारतातल्या पहिल्या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीचं स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयीकरण झालं आणि एअर  इंडिया अस त्याच नामांकरण झाले. सध्याच्या घडीला एअर इंडिया कर्जबाजारी झाली असून या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

loading image