३०० रुपयांनी स्वस्त मिळणार गॅस सिलेंडर, जाणून घ्या कसं

३०० रुपयांनी स्वस्त मिळणार गॅस सिलेंडर, जाणून घ्या कसं

LPG Subsidy Update : भारतामध्ये प्रत्येक कुटुंबाला १४.२ किलोच्या १२ सिलिंडरवर सबसिडी मिळते. जर ग्राहकाला त्यापेक्षा जास्त सिलिंडर घ्यायचे असतील तर ते बाजारभावाने विकत घेता येतात. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं गॅसवर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला. LPG Gas ची सबसिडी विविध राज्यांच्या प्रशासनाच्या नियमांवर अवलंबून आहे. किंमती प्रचंड घसरल्यामुळे सबसिडी बंद करण्यात आली होती. मात्र, आता काही दिवसांपासून महागाईनं उच्चांक गाठला आहे. त्यामुळे गॅसच्या किंमतीही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. 

सबसिडी मिळणारा १४.२ किलो किंमतीचा सिलेंडर नोव्हेंबर २०२० मध्ये ५९४ रुपयांना होता. आता याची किंमती ८१९ रुपये इतकी झाली आहे. ज्यांना सबसिडी मिळत होती त्यांना पैसे मिळतीलच. पण काही लोकांच्या खात्यावर पैसे जमा होत नाही. त्याचं प्रमुख कारण म्हणजे, तुमचं आधार लिंकिंग नसेल. तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न  (ज्यामध्ये सबसिडी येते) नसेल. तसं असेल तर लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्यासोबत जोडून घ्या... 

LPG कनेक्शन आधारसोबत लिंक होणं महत्वाचं -  
घरगुती सिलेंडरवर मिळणाऱ्या सबसिडीसाठी आणखी एक महत्वाची बाब, म्हणजे एलपीजी कनेक्शनसोबत आधार लिंक झालेलं असलं पाहिजे. समजा तुमचं बँक खात आणि आधार लिंक असेल पण गॅस कनेक्शन आणि आधार लिंक नसेल, तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. त्यामुळे आधार लिंक करणं गरजेचं आहे. 

 LPG Subsidy कोणाला मिळते? 
गॅस सिलिंडरवर सबसिडी सर्वांना मिळत नाही. जर एखाद्या व्यक्तीची वार्षिक कमाई १० लाखांपेक्षा जास्त असेल, तर तो व्यक्ती सबसिडीसाठी पात्र ठरत नाही. आणखी एक महत्वाचं तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं वार्षिक उत्पन्न दहा लाखांच्या पुढे असता कामा नये. तसं असेल तर तुम्ही सबसिडीसाठी पात्र नसाल. 

एलपीजी सबसिडी किती मिळेल?
प्रसारमाध्यमांच्या ताज्या रिपोर्ट्सनुसार, घरगुती गॅस सिलेंडरवर मिळणाऱ्या सबसिडीमध्ये वाढ करण्यात आली आहे.  सबसिडीची रकम वाढवून १५३.८६ रुपयांवरुन २९१.४८ रुपये इतकी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे  प्रधानमंत्री उज्जवला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या गॅसवरील सबसिडी १७४.८६ वरुन ३१२.४८ करण्यात आली आहे. जर तुम्हाला सबसिडी मिळत असेल तर जवळपास ३०० रुपयांची बचत नक्की होईल.  

अशा प्रकारे एलपीजी सबसिडीची स्थिती कळू शकते:

1. मोबाइलवरून गॅस सिलेंडरच्या सबसिडीबद्दल जाणून घेण्यासाठी आधी Mylpg.in जावे लागेल. या वेबसाइटवर तुम्हाला तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांचे (एचपी, भारत आणि इंडेन) टॅब दिसतील. इथं गेल्यानंतर तुम्ही तुमचं ज्या कंपनीचं असेल त्यावर क्लिक करा.
2. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल, त्यात मेन्यूमध्ये गेल्यानंतर तुमचा 17 अंकी एलपीजी आयडी टाका. जर ग्राहकांना त्यांचा एलपीजी आयडी माहीत नसेल तर 'Click here to know your LPG ID' येथे क्लिक करा. 

3. त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, LPG कन्झ्युमर आयडी, राज्याचे नाव आणि वितरकाची माहिती टाकली पाहिजे. त्यानंतर कॅप्चा कोड भरल्यानंतर प्रोसेस बटणावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यावर तुम्हाला एलपीजी आयडी दिसेल.

4. आता तुमच्या खात्याचा तपशील एका पॉप-अपवर दिसेल. इथं तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड एलपीजी खात्याशी लिंक केले आहे की नाही या माहितीसह तुम्ही सबसिडीचा पर्याय सोडला आहे की नाही हे देखील समजेल.

5. या पेजच्या डाव्या बाजूला 'सिलेंडर बुकिंग हिस्ट्री किंवा सबसिडी ट्रान्सफर देखे' यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यावर ग्राहकांना सबसिडीची रक्कम दिसेल.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com