लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकला 375 कोटींचा नफा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मुंबई: लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकने सरलेल्या डिसेंबरच्या तिमाहीत 375.5  कोटी रुपयांचा  निव्वळ नफा नोंदविला आहे. त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने 400.3 कोटी रुपयांचा नफा मिळविला होता. यादरम्यान कंपनीचा महसूल  2,3131.2 कोटींवरून वधारून 2,473 कोटी रुपयांवर पोचला आहे. त्यात ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. 

''सरलेल्या तिमाहीत कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. अमेरिकेतून मिळणाऱ्या महसुलात 5.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.'' असे  कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक संजय जलोना यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

आज  मुंबई शेअर बाजारात लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकचा शेअर 1804.10 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 1.64 टक्क्यांची म्हणजेच 29.15 रुपयांची वाढ झाली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 31 हजार 326 कोटींचे बाजारभांडवल आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: L&T Infotech net profit falls 6 pct QoQ at Rs 375.5 crore