esakal | लुफ्तान्सा एअरलाईन्सची विस्ताराबरोबर हातमिळवणी
sakal

बोलून बातमी शोधा

लुफ्तान्सा एअरलाईन्सची विस्ताराबरोबर हातमिळवणी

आघाडीची युरोपियन एअरलाईन लुफ्तान्साने आपले भारतातील नेटवर्क अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने विस्तारा एअरलाईन्ससह करार केला आहे.

लुफ्तान्सा एअरलाईन्सची विस्ताराबरोबर हातमिळवणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आघाडीची युरोपियन एअरलाईन लुफ्तान्साने आपले भारतातील नेटवर्क अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने विस्तारा एअरलाईन्ससह करार केला आहे. नव्या कराराचा एक भाग म्हणून लुफ्तान्सा समूह नेटवर्कद्वारा दिल्ली मार्गे भारतातील १० मुख्य शहरे १२६ उड्डाणांद्वारे एकमेकांशी जोडली जाणार आहेत.

वाचा : चलनवाढीचा पारा चढला

लुफ्तान्साच्या जागतिक नेटवर्कला विस्ताराचे भारत देशांतर्गत असलेले भक्कम नेटवर्क जोडले गेल्यामुळे लुफ्तान्साचे ग्राहक पूर्वीच्या तुलनेत अधिक वाढणार आहेत. तसेच या भागीदारीमुळे भारतातील कोलकाता, गोवा आणि पुणे यांसारख्या १० प्रमुख शहरांमधील ग्राहक युरोप, कॅनडा आणि अमेरिकेतील मोठमोठ्या गंतव्यस्थानांसह लुफ्तान्सा समूहाच्या जगभरातील नेटवर्कवरील गंतव्यस्थानांशी जोडले जातील, असा विश्‍वास लुफ्तान्साने दर्शविला आहे. 

web title : Lufthansa Airlines merges with vistara

loading image