माधबी पुरी बुच बनल्या SEBI च्या पहिल्या महिला अध्यक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhbi Puri

माधबी पुरी बुच यांची SEBI चे अध्यक्ष म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

माधबी पुरी बुच बनल्या SEBI च्या पहिल्या महिला अध्यक्षा

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीच्या (SEBI) नवीन अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. माधबी पुरी बुच यांची सेबीच्या (SEBI) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सेबीचे माजी अध्यक्ष अजय त्यागी यांचा विस्तारित कार्यकाळ या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये संपत आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: SEBI ने केले महत्त्वाचे बदल; गुंतवणुकदारांसाठी नवीन नियम

SEBI च्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला

माधबी पुरी बुच यांची SEBI चे अध्यक्ष म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. बुच या सेबीच्या माजी पूर्णवेळ सदस्य आहेत. अजय त्यागी यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ फेब्रुवारीमध्ये संपत आहे. मार्च 2017 मध्ये या पदाची जबाबदारी स्वीकारून मार्केट रेग्युलेटरची पूर्णवेळ सदस्य बनणाऱ्या त्या पहिल्या महिला असणार आहेत. यासह माधबी पुरी बुच या SEBI च्या प्रमुख बनलेल्या पहिल्या महिलाही ठरल्यात.

ICICI बँकेतून करिअरची सुरुवात

माधवी बुच यांनी त्‍याच्‍या करिअरची सुरुवात ICICI बँकेतून केली आणि फेब्रुवारी 2009 मध्‍ये त्या बँकेच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी बनल्या. 2011 मध्ये त्या सिंगापूरच्या ग्रेटर पॅसिफिक कॅपिटलमध्ये रुजू झाल्या. सेबीमध्ये रुजू होण्यापूर्वी त्या शांघायमधील न्यू डेव्हलपमेंट बँकेत कार्यरत होत्या.

हेही वाचा: मुकेश अंबानी आणि रिलायन्सवर SEBI ची मोठी कारवाई; शेअर बाजारात गडबड केल्याचा ठपका

माजी सेबी प्रमुख अजय त्यागी हे हिमाचल प्रदेश केडरचे 1984 बॅचचे प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. त्यांची सेबीचे अध्यक्ष म्हणून 1 मार्च 2017 रोजी नियुक्ती झाली. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आली होती आणि त्यांना ऑगस्ट 2020 मध्ये सहा महिन्यांची आणि नंतर 18 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

Web Title: Madhbi Puri Becomes First Woman Chairperson Of Buch Sebi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sebi