esakal | मुकेश अंबानी आणि रिलायन्सवर SEBI ची मोठी कारवाई; शेअर बाजारात गडबड केल्याचा ठपका
sakal

बोलून बातमी शोधा

mukesh ambani

याबाबत रिलायन्सची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाहीये.

मुकेश अंबानी आणि रिलायन्सवर SEBI ची मोठी कारवाई; शेअर बाजारात गडबड केल्याचा ठपका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजाराचे नियमन करणारे Securities and Exchange Board of India (सेबी) ने मुकेश अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला 40 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीने नोव्हेंबर 2007 मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड (आरपीएल) च्या शेअर कारभारामध्ये गडबड झाल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे. 
मुकेश अंबानी यांच्यावर 15 तर रिलायन्सला 25 कोटी दंड
या साऱ्या प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीला 25 कोटी तर मुकेश अंबानीसोबत इतर दोघांना 15 कोटी रुपयांचा दंड झाला आहे. याशिवाय नवी मुंबई सेज प्रायव्हेट लिं. कडून 20 कोटी रुपये आणि मुंबई सेज लि. ला 10 कोटी रुपयांचा दंड भरण्यास सांगितले गेले आहे.

हेही वाचा - केंद्र सरकारला जीएसटीने दिला हात; संकलनात मोठी वाढ​
शेअर कारभारात हेराफेरीचे प्रकरण
हे प्रकरण नोव्हेंबर 2007 मध्ये आरपीएल शेअर्सची रक्कम आणि वायदा खंड खरेदी आणि विक्रीशी निगडीत आहे. याआधी, आरआयएलने मार्च 2007 मध्ये आरपीएलमध्ये 4.1 टक्के शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला होता. ही कंपनी नंतर आरआयएलमध्ये विलिन करण्यात आली.
सेबीने केली ही टिप्पणी
या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या सेबीचे अधिकारी बी जे दिलीप यांनी आपल्या 95 पानांच्या आदेशात म्हटलंय की, सिक्युरिटीजच्या प्रमाणात किंवा किंमतीत कोणताही फेरबदल केल्याने बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी होतो आणि बाजाराच्या घडामोडीत त्याचा सर्वाधिक फटका बसतो. याबाबत रिलायन्सची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाहीये.

loading image