महाराष्ट्र बॅंकेला नॅफस्कॉबकडून "उत्कृष्ट राज्य बॅंक' पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेला देशातील "उत्कृष्ट राज्य बॅंक' म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंकेकडून (नॅफस्कॉब) विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारांचा वितरण सोहळा डिसेंबरमध्ये होणार आहे. 

पुणे - ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेला देशातील "उत्कृष्ट राज्य बॅंक' म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंकेकडून (नॅफस्कॉब) (National Federation of State Co-operative Banks) विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारांचा वितरण सोहळा डिसेंबरमध्ये होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातील विविध राज्य सहकारी बॅंकांनी त्यांच्या वार्षिक धोरणानुसार शेतकऱ्यांसह विविध घटकांना केलेला कर्जपुरवठा, प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांना सक्षम करण्यासाठी केलेले प्रयत्न, केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच, रिझर्व्ह बॅंक आणि नाबार्डच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन या निकषांच्या आधारावर हा पुरस्कार दिला जातो. या सर्व निकषांची पूर्तता करण्यात अग्रेसर ठरलेल्या महाराष्ट्र बॅंकेला विशेष पुरस्काराने सन्मानित केले आहे. बॅंकेच्या अनुत्पादक कर्जाचे निवड प्रमाण शून्य टक्के आहे. राज्य बॅंकेच्या अंतर्गत 31 जिल्हा बॅंका, 21 हजार प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था आहेत. सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, नागरी बॅंका आणि कृषी प्रक्रिया संस्थांपासून शेतकऱ्यांपर्यंत कर्जपुरवठा करण्यात राज्य बॅंकेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. राज्य बॅंकेने कर्जदारांसाठी आत्मनिर्भर कर्ज योजना तसेच अडचणीतील उद्योगांसाठी कर्ज पुनर्बांधणी योजना जाहीर केली आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व सभासद, खातेदारांसोबतच बॅंकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे शक्‍य झाले आहे. बॅंकेच्या सेवकांनी मनात आणले तर अडचणीतील बॅंकेतही कायापालट होऊ शकतो, त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. 
- विद्याधर अनास्कर,  अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचा विस्तार : 
सहा प्रादेशिक कार्यालये ः 51 शाखा 
बॅंकेने दिलेली कर्जे : 20 हजार 817 कोटी 
ठेवी : 20 हजार 849 कोटी 
निव्वळ नफा ः 325 कोटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Bank receives award from National Federation of State Co-operative Banks