गाडी घेताय? घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मार्च 2019

मुबंई : महिंद्रा अँड महिंद्रा लि.ने आपल्या खासगी वापराच्या आणि व्यावसायिक वाहनांच्या किंमतीमध्ये 5,000 ते 73,000 रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली. 20.7 अब्ज डॉलर मूल्याच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा अॅँड महिंद्रा लि.ने वाहनांच्या किंमतीमध्ये 0.5 – 2.7 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्राच्या विविध खासगी वापराच्या आणि व्यावसायिक वाहनांच्या किमतीत 1 एप्रिलपासून वाढ होणार आहे  . 

कच्च्या मालात आणि वाहन उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत वाढ होत असल्यामुळे वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचे ठरवले आहे. तसेच नियामक मंडळाने केलेल्या काही बदलांमुळे वाहनांच्या किंमतीत वाढ करावी लागणार असल्याचे मत महिंद्रा अॅँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटीव्ह विभागाचे अध्यक्ष राजन वधेरा यांनी व्यक्त केले. 

आज (गुरुवार) मुंबई शेअर बाजारात महिंद्रा अॅँड महिंद्रा कंपनीचा शेअर 5.45 रुपयांच्या घसरणीसह 656.15 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 81 हजार 491.27 कोटींचे बाजारभांडवल आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahindra announces price hike of 0.5 to 2.7 pct effective 1st April 2019