कोटींचे कर्ज, पतीची आत्महत्या ते CCD ची सीईओ; असा होता मालविकाचा प्रवास | Malavika Hegde Saved Cafe Coffee Day | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malavika Hegde The Woman Who Saved Cafe Coffee Day

कोटींचे कर्ज, पतीची आत्महत्या ते CCD ची सीईओ; मालविकाचा प्रवास

मित्रांसोबत वीकेंडला मजा मस्ती करायची असेल, पहिल्यांदा डेटवर जात असाल किंवा तुमच्या कुटुंबाला तुमच्या पहिला पगारातून ट्रीट द्यायची असेल, कित्येक ग्राहकांचा आवडता पर्याय म्हणजे कॅफे कॉफी डे(CCD). CCD हे प्रत्येक ग्राहकांसाठी हक्काचं ठिकाण होते, जिथे घालवलेला काही वेळ आयुष्यभराच्या आठवणींमध्ये म्हणून ते सोबत घेऊन जातात. पण जेव्हा जुलै 2019 मध्ये भारतातील सर्वात मोठी कॉफी शॉप चेन कॅफे कॉफी डेचे संस्थापक व्ही. जी.सिद्धार्थ यांनी आत्महत्येची बातमी समोर आले तेव्हा देशातील सर्वांनाच धक्का बसला. मंगळूरजवळील नेत्रावती नदीत उडी मारून त्यांनी आत्महत्या केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ३६ तासांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह नदीपात्रात सापडला.(Malavika Hegde The Woman Who Saved Cafe Coffee Day)

सिद्धार्थ हे त्यांच्या कारने सकलेशपूरला जात असताना त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला एका पुलावर गाडी थांबविण्यास सांगितले आणि त्या पुलाच्या शेवटी त्यांची वाट पाहण्यास सांगितले. तासाभरानंतरही ते परत आले नाही त्यामुळे ड्रायव्हरने त्यांना कॉल केला पण त्याचा फोन बंद होता. त्यानंतर ड्रायव्हरने त्यांच्या मोठ्या मुलाला फोन करून वडील बेपत्ता असल्याची माहिती दिली आणि त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली.

जगभरातील कॉफी संस्कृती पाहिल्यानंतर कर्नाटकातील सिद्धार्थने कॉफी शॉप उघडण्याची योजना आखली होती आणि 1996 मध्ये बंगळुरूमधील ब्रिगेड रोड येथे पहिला कॅफे उघडला. अनेक अडचणींवर मात करून अखेर कॉफी शॉप सुरू झाले.

V G Siddhartha, founder of Cafe Coffee Day | Photo: BCCL

V G Siddhartha, founder of Cafe Coffee Day | Photo: BCCL

हेही वाचा: Makar Sankranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या शास्त्रीय महत्त्व

योग्य फायदेशीर व्यवसायिक मॉडेल तयार करण्यात अयशस्वी

कर्जबाजारीपणा आणि व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय त्यांच्या शेवटच्या पत्रावरून व्यक्त करण्यात आला. एएनआयने एक टाईप केलेले चिठ्ठी जाहीर केले होते. याचिठ्ठीमध्ये, सिद्धार्थने योग्य फायदेशीर व्यवसायिक मॉडेल तयार करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल माफी मागितलेली आहे. ते म्हणाले की,'' प्रायव्हेट इक्विटी पार्टनर आणि इतर कर्जदारांचा दबाव आणि आयकर विभागाकडून होणारा छळ मला असह्य झाला आहे.'' तसेच सिद्धार्थने त्याच्या नोटमध्ये असेही लिहिले आहे : "माझा हेतू कोणाचीही फसवणूक किंवा दिशाभूल करण्याचा कधीच नव्हता, मी एक उद्योजक म्हणून अयशस्वी झालो आहे."

malavika Hegde CEO of Cafe Coffee Day | Photo: Economic Times

malavika Hegde CEO of Cafe Coffee Day | Photo: Economic Times

मालविका हेगडे यांनी CDELचे CEOम्हणून पदभार स्वीकारला

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर कॉफी डे कंपनी चालू राहणार नाही, असे अनेकांना वाटत होते आणि त्याच्यानंतर ही कंपनी कोण चालवणार, असे अनेक प्रश्न त्यावेळी उपस्थित होता. थकित कर्जामुळे कंपनी पुन्हा उभी राहू शकत नाही असा लोकांचा विश्वास होता. पण व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या पत्नी मालविका हेगडे यांनी सर्वांच्या शंका धुडकावून लावल्या. मालविका यांनी सिंगल वुमन आणि दोन मुलांची आई असूनही CCDबंद होण्यापासून वाचविण्याचा निर्णय घेतला आणि तो सार्थ करत एक मैलाचा दगड गाठला आहे.

डिसेंबर 2020 मध्ये, मालविका यांनीने कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड (CDEL)ची CEO म्हणून पदभार स्वीकारला. त्या दिवसापासून तिने कंपनीच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले. 2019 मध्ये कॉफी डेच्या नावे 7,000 कोटी रुपयांचे कर्ज होते. पती निधनानंतर दुःखात असलेल्या मालविका यांच्यासाठी हे खूप मोठे ओझे होते पण, त्यांनी कधीच हार मानली नाही.

Malavika Hegde with her husband V G Siddhartha | Photo: dare2compete

Malavika Hegde with her husband V G Siddhartha | Photo: dare2compete

हेही वाचा: CCD च्या प्रमुखपदी मालविका हेगडे?

कोण आहे मालविका हेगडे?

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांची मुलगी असलेल्या मालविका यांचा जन्म 1969 मध्ये बंगळुरू येथे झाला जिथे त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि बंगळुरू विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी घेतली. त्यांनी 1991 मध्ये सिद्धार्थसोबत लग्नगाठ बांधली आणि त्यांना ईशान आणि अमर्त्य असे दोन मुलं आहेत. CCDचे CEO होण्यापूर्वी, मालविका यांनी यापूर्वी अनेक वर्षे CDELच्या नॉन-बोर्ड सदस्य म्हणून काम केले होते.

मालविका यांचे कर्मचाऱ्यांना पत्र

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीची सीईओ म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी मालविका यांनी 2020 मध्ये कंपनीच्या 25,000 कर्मचार्‍यांना एक पत्र लिहले होते. त्यात, कंपनीच्या भविष्यासाठी त्या वचनबद्ध असल्याचे सांगत त्यांनी आश्वासन दिले की, कॅफे कॉफी डे ब्रॅंड जतन करण्यास सक्षम आहेत . दिवंगत संस्थापक सिद्धार्थ यांच्या मालकीच्या एका खाजगी संस्थेने कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड (CDEL) या सूचीबद्ध संस्थेने 2,693 कोटी रुपये थकित असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर त्यांचे हे पत्र समोर आले. "आम्ही कंपनीच्या भविष्यासाठी वचनबद्ध असल्याने आणखी काही गुंतवणुकीची विक्री करून कर्ज कमी करण्यासाठी प्रयत्न करू," असेही त्यांनी या पत्रात लिहिले होते.

मालविका यांच्या नेतृत्वाखाली CCDची पुर्नउभारणी

सिद्धार्थच्या आत्महत्येनंतर, मालविका हेगडे यांनी कोविड लॉकडाऊन काळातही कर्ज कमी करण्यात यश मिळवले. याबाबत त्यांनी सांगितले की, आव्हाने वाढली पण गेल्या 12 महिन्यांत कुठेतरी सिद्धार्थचा अभिमानास्पद वारसा जपण्याचे माझे ध्येय आहे. प्रत्येक कर्जदाराला माझ्या क्षमतेनुसार सेटलमेंट करण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी आणि आमच्या कर्मचार्‍यांना उत्साही आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपावली आहे.”

31 मार्च 2019 पर्यंत CDELवर 7,000 कोटी रुपयांचे कर्ज होते. परंतु CDELच्या गेल्या वर्षी ऑगस्टमधील माहितीनुसार, काही प्रमाणात कर्ज कपातीनंतर कंपनीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी व्यवस्थापन कठोर परिश्रम केले. 31 मार्च 2021 पर्यंत त्याचे निव्वळ कर्ज रु. 1,731 कोटी होते असे त्याने आपल्या वार्षिक अहवालात नमूद केले होते. अहवालात असे म्हटले आहे की, “एकूण कर्ज निधी रु. 1,779 कोटी होता ज्यामध्ये रु. 1,263 कोटी अल्पकालीन कर्जाचा आणि 516 कोटींचे कर्जाचा समावेश होता.

कंपनीने कर्जदारांकडून एक रुपयाही न घेता 31 मार्च 2020 पर्यंत कर्ज 3,100 कोटी रुपयांवर आणले, जे मार्च 2019 मध्ये 7,200 कोटी रुपये होते,"

मालविकाच्या पुढाकारामुळे, कॅफे कॉफी डेच्या कर्जाचा बोजा 2021 पर्यंत 1,731 कोटी रुपयांपर्यंत कमी झाला. हा खूप मोठा टप्पा होता. कर्जाच्या ओझ्याशिवाय सीसीडीला अब्जावधी डॉलर्सची कंपनी बनवण्याचे मालविका यांचे ध्येय आहे. आपल्या दिवंगत पतीच्या पावलावर पाऊल ठेवत, देशाच्या कानाकोपऱ्यात कॉफी डे शॉप्स पोहचविण्याचे मालविका यांचे स्वप्न आहे.

Cafe Coffee Day | Photo: BCCL

Cafe Coffee Day | Photo: BCCL

हेही वाचा: Relationship Advice:लग्नाआधी करा 'या' गोष्टी, नंतर पश्चाताप नाही होणार

कोविड-19 च्या काळातही CCDचा विकास झाला

कोविड-19 मुळे जगभरातील अनेक व्यवसाय बंद झाले आहेत. पण कॅफे कॉफी डेने महामारीच्या काळातही विकास करू शकला. हे सर्व CCDच्या नवीन CEO, मालविका यांच्यामुळे शक्य झाले आहे, ज्याने ब्रँडचे मूल्य कायम ठेवले आहे आणि त्यांच्या व्यवसायात भांडवल टाकण्यासाठी अनेक नवीन गुंतवणूकदारांशी चांगले संबंध निर्माण केले आहेत आणि CCD चा ब्रँड जतन करणे योग्य आहे हे गुंतवणूकदारांना पटवून देण्यास त्या सक्षम आहे.

कॅफेच्या सर्व शाखांमध्ये कोविड सुरक्षा प्रोटोकॉल विचारात घेऊन विविध उपाययोजना अंमलात आणल्या गेल्या. यामुळे सीसीडीच्या ग्राहकांना पुन्हा मिळविण्यास यश मिळाले.

अनेक उद्योगपती परदेशात पळून जात असताना त्यांनी फर्म व्यवस्थापित करण्याचा निर्णय घेतला आणि पुनर्बांधणी करण्याचे सुनिश्चित केले. त्यांच्या धैर्याला आणि जिद्दीला सलाम.

CCD संपूर्ण देशात कॉफी सर्व्ह करते

सध्या, कॅफे कॉफी डे (CCD)कडे 333 CCDव्हॅल्यू एक्सप्रेस किओस्कसह देशभरात 572 कॅफे आहेत. 36,000 पेक्षा जास्त व्हेंडिंग मशीनद्वारे CC कॉफी देणारा हा एक मोठा व्यवसाय आहे. कॅफे कॉफी डे (CCD), एकत्रित निव्वळ महसुलात 47 टक्के योगदान दिले. लॉजिस्टिक व्यवसायाचा महसूल 45 टक्के होता, तर उर्वरित 8 टक्के महसूल लॉजिस्टिकमधून होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestyle
loading image
go to top