'हिरो मोटोकॉर्प'ची विक्री दुसऱ्या तिमाहीत विक्रमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे : हिरो मोटोकॉर्प या सर्वांत मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीने मोटारसायकल व स्कूटरची विक्रमी विक्री केली आहे. कंपनीने यंदाच्या आर्थिक वर्षामधील नुकत्याच संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) 20 लाख युनिट्‌सच्या विक्रीचा टप्पा गाठला आहे. जागतिक पातळीवर प्रथमच एखाद्या दुचाकी उत्पादक कंपनीने असा विक्रम केला आहे. 

कंपनीने दुसऱ्या तिमाहीत एकूण 20,22,805 युनिट्‌सची विक्री नोंदविली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये करण्यात आलेल्या विक्रीच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीमधील विक्रीत 11 टक्‍क्‍यांची वाढ झाली. यंदाच्या वर्षातील सप्टेंबर या एकाच महिन्यात सात लाखांहून अधिक गाड्यांची विक्री केलेली ही एकमेव दुचाकी उत्पादक कंपनी ठरली आहे. हिरो मोटोकॉर्पने चालू आर्थिक वर्षाच्या सहा महिन्यांमध्येच (एप्रिलपासून ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत) 40 लाख विक्रीचा टप्पा गाठला आहे. 

स्प्लेंडर, ग्लॅमर, पॅशन व एचएफ डिलक्‍स या मोटारसायकलींसह ड्युएट, मेस्ट्रो एज व प्लेजर या स्कूटरना मोठी मागणी दिसून आली आहे, असे कंपनीच्या विक्री, विपणन व कस्टमर केअर विभागाचे प्रमुख अशोक भसिन यांनी म्हटले आहे.

Web Title: marathi news marathi websites Indian Automobile sector Hero Motocorp