‘जीएसटी’ संकलन मार्चमध्ये 1 लाख कोटींचा टप्पा गाठणार 

वृत्तसंस्था
Saturday, 23 March 2019

नवी दिल्ली:  वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून (जीएसटी) करण्यात येत असलेल्या कर संकलनातून मार्च महिन्यात सरकारला 1 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची आशा आहे. मार्च महिना संपण्यासाठी अजून 8 दिवस शिल्लक आहेत. गेल्या महिन्यात जीएसटी कर संकलन घटले होते. फेब्रुवारी महिन्यात 97 हजार 247 कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते. तर त्याआधीच्या महिन्यात (जानेवारी 2019) मात्र 1 लाख 2 हजार कोटींचे कर संकलन झाले होते. 

जीएसटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या कराचे लक्ष्य सरकाने कमी केले आहे. चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारीपर्यंत जीएसटीच्या माध्यमातून आतापर्यंत 10.70 लाख कोटींचे कर संकलन झाले आहे. चालू आर्थिक वर्षात जीएसटी संकलन लक्ष्य 13.71 लाख कोटी रुपयांवरून कमी करत 11.47 लाख कोटी रुपयांवर आणले आहे. 

एप्रिल 2018, ऑक्टोबर 2018 आणि जानेवारी 2019 आणि आता मार्च 2019 मध्ये जीएसटी कर संकलन पुन्हा 1 लाख कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. वर्षातील तीन महिने सोडता ते एक लाख कोटी रुपयांच्या आत मात्र 90 हजार रुपयांच्या वरच राहिले आहे. चालू आर्थिक वर्षात मे (94 हजार  016 कोटी रुपये), जून (95 हजार 610 कोटी रुपये), जुलै (96 हजार 483 कोटी रुपये), ऑगस्ट (93 हजार  960 कोटी रुपये) व सप्टेंबर (94 हजार 442 कोटी रुपये), नोव्हेंबर (97 हजार 637) आणि डिसेंबर 2018 (94 हजार  726) आणि फेब्रुवारी 2019 मध्ये (97 हजार 247) अप्रत्यक्ष कर संकलन एक लाख कोटी रुपयांच्या आतच राहिले आहे.

जीएसटी कर रचनेत करण्यात आलेले बदल, पारदर्शकता आणि कर भरण्यात सुलभता यामुळे महसुलात वाढ होत आहे.  जीएसटीच्या बैठकीत आता रिअल इस्टेट क्षेत्राला आता दिलासा देण्यात आला आहे. तरी देखील मार्चमध्ये कर संकलनातून 1 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. जीएसटी करप्रणालीत अनेक वस्तूंचा समावेश वाढत आहे तर दुसरीकडे काही वस्तूंच्या करात कपात करण्यात येत आहे त्याचा फायदा सरकारला होत आहे.   सध्या जीएसटीचे एकूण चार टप्पे आहेत. 5,12,18 आणि 28 टक्के टॅक्स स्लॅब आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: March GST collection may touch 1 lakh cr