फिटनेस,स्पोर्ट्सवेअरची बाजारपेठ भारतात विस्तारतेय

Market for Fitness wear and Sportswear is increasing
Market for Fitness wear and Sportswear is increasing

पुणे: आधुनिक आणि फास्ट झालेल्या जमान्यात फिटनेस हा परवलीचा शब्द बनला आहे. विविध खेळांनाही प्रोत्साहन मिळताना दिसते आहे. मॅरेथॉनसारख्या उपक्रमांनी तर खूप लोकप्रियता मिळवली आहे. तरुणाई शरीर बांधेसुद ठेवण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. त्यामुळेच खेळ आणि व्यायामाशी संबंधित पेहराव आणि एक्सेसरिजलाही मोठी मागणी बाजारपेठेत दिसून येते आहे. 

भारतात देखील विविध खेळांविषयी जागृती वाढते आहे. परिणामी स्पोर्ट्सवेअर आणि त्यासंबंधित बाजारपेठ देखील मोठ्या प्रमाणावर विस्तारते आहे. भारतात स्पोर्ट्सवेअरची बाजारपेठ सुमारे दहा हजार कोटींवर पोचली आहे. 

अलीकडच्या काही वर्षात रिेटेल स्पोर्ट्सवेअर ही नवीन श्रेणीच उद्याला आली आहे. टी-शर्ट्स, शॉर्ट्स, बूट इत्यादी खेळताना आवश्यक बाबींना मोठी मागणी दिसते आहे. अंडर आर्मर या अमेरिकी ब्रॅंडनेसुद्धा मार्च  2019 मध्ये दिल्लीत आपले स्टोअर सुरू करून भारतीय बाजारपेठेत उडी घेतली आहे. अंडर आर्मर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तुषार गोकुलदास ब्रॅंडच्या विस्तारासाठी आणि कंपनीच्या भारतातील व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहेत. 'आगामी काळात स्पोर्ट्सवेअरची बाजारपेठ भारतात मोठ्या प्रमाणात विस्तारणार असून सध्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळूरू, हैदराबाद सारख्या महत्त्वाच्या शहरांबरोबरच इतरही शहरात विस्तार करण्यासाठी अंडर आर्मर इंडिया प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातसुद्धा अंडर आर्मरने नवे स्टोअर सुरू केले आहे. 

ऑफलाईनबरोबरच ई-कॉमर्स व्यासपीठाचा वापरसुद्धा कंपनीकडून यशस्वीरित्या केला जातो आहे. देशाच्या बाजारपेठेत या श्रेणीचे योगदान वाढत चालले आहे. पुढच्या दशकभरात भारतात या श्रेणीची मोठी बाजारपेठ तयार होऊन त्याचा लाभ रोजगार निर्मितीसाठीसुद्धा होईल', असे मत तुषार गोकुलदास यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com