सचिन तेंडुलकरने 'कुठे' केली 2 मिलियन अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक?

Sachin Tendulkar
Sachin TendulkarTwitter
Summary

सचिन तेंडुलकरची ही गुंतवणूक एक नवी इनिंग खेळण्यासाठी उचललेले मोठे पाऊल मानले जात आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नुकतीच एंटरटेनमेंट आणि टेक्नोलॉजी कंपनी Jet Synthesys मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सचिन तेंडुलकरने तब्बल 2 मिलियन अमेरिकी डॉलर्स अर्थातच 14.8 कोटी रुपये गुंतवल्याची माहिती या कंपनीने दिली आहे. सचिन तेंडुलकरची ही गुंतवणूक एक नवी इनिंग खेळण्यासाठी उचललेले मोठे पाऊल मानले जात आहे.

एंटरटेनमेंट आणि टेक्नोलॉजी कंपनी Jet Synthesys मध्ये सचिनने केलेली मोठी गुंतवणूक कंपनीसाठी खूप फायद्याची आहे, तसेच सचिनच्या गुंतवणुकीमुळे Jet Synthesys च्या वाढीला चांगला वाव मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.

सचिन आणि Jet Synthesys चे जुने नातेसंबंध

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि एंटरटेनमेंट आणि टेक्नोलॉजी कंपनी Jet Synthesys यांचे जुने नाते आहे. पुण्याच्या या कंपनीसोबत सचिनचे JV अर्थात जॉइन्ट व्हेंचर देखील आहे. Jet Synthesys आणि सचिन दोघांनी हे व्हेंचर क्रिकेटच्या डिजिटल डेस्टिनेशन, 100MB नावाने सुरू केले आहे. सोबतच इमर्सिवव्ह क्रिकेट गेमसारख्या सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स (Sachin Saga Cricket Champions) आणि सचिन सागा व्ही आर (Sachin Saga VR) यांचाही समावेश आहे.

Sachin Tendulkar
जीएसटी वसुलीची गाडी पुन्हा रुळावर

कंपनीच्या स्टेक होल्डर्समध्ये अनेक दिग्गज

एंटरटेनमेंट आणि टेक्नोलॉजी कंपनी Jet Synthesys मध्ये केवळ सचिन तेंडुलकरच नाही तर अनेक दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. ज्यात पुण्यातील बडे उद्योगपती अदर पूनावाला, क्रिस गोपालकृष्णन तसेच थर्मेक्स, त्रिवेणी ग्रुप, योहान पूनावाला ग्रुप आणि DSP ग्रुप सारख्या कंपन्या Jet Synthesys चे स्टेक होल्डर्स आहेत. Jet Synthesys मध्ये अनेक दिग्गजांसोबत आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नावही समाविष्ट झाले आहे.

ग्लोबल पार्टनरशिप :

एंटरटेनमेंट आणि टेक्नोलॉजी कंपनी Jet Synthesys हाय नेटवर्क प्लेसोबतच मोबाइल गेम्स डेव्हलप करणारी कंपनी आहे. याचाही मोठा फायदा कंपनीला होत असतो. याचे ग्लोबल पब्लिशिंग पार्टर्नरशिप WWE, Square Enix सोबत आणखी बऱ्याच दिग्गज कंपनीही आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com