मॉरिशियन बांधकाम रँकिंगमध्ये लार्सन अँड टुब्रो आघाडीवर | Larsen and Turbo update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Larsen and toubro

मॉरिशियन बांधकाम रँकिंगमध्ये लार्सन अँड टुब्रो आघाडीवर

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : द ला सेन्टीनेल समूह, या प्रतिष्ठेच्या अशा मॉरिशियन मीडिया हाउसने (Mauritius media house) डीसीडीएम रिसर्च कंपनीच्या (DCDM Research Company) सहकार्याने तयार केलेल्या बांधकाम क्षेत्रातील पहिल्या शंभर कंपन्यांच्या यादीत लार्सन अँड टुब्रोने (larsen and turbo) पहिला क्रमांक (First rank) मिळवला आहे.

हेही वाचा: मुंबईत लहान मुलांचा कोविड संसर्ग नियंत्रणात; डेल्टा व्हेरियंटचे 75% रुग्ण

पोर्ट लुईस व क्युरपाइप या शहरांना जोडणारा मॉरिशियस मेट्रो एक्सप्रेस प्रकल्प वेळेत आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करून एल अँड टी ने हा सन्मान मिळवला आहे. 26 किलोमीटरच्या या प्रकल्पात 19 स्थानके आहेत. या मेट्रो प्रकल्पाचा पोर्ट लुईस ते क्वात्रे बोर्न्स हा सुमारे पंधरा किलोमीटरचा टप्पा यापूर्वीच पूर्ण झाला आहे. 50 लाख प्रवासी त्याचा वापरही करीत आहेत.

पोर्ट लुईस ते रोझ हिल या मॉरिशियस मेट्रो एक्सप्रेसच्या पहिला टप्प्याचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी केले होते. लार्सन अँड टुब्रो चे विविध मोठे प्रकल्प सध्या जगातील 50 देशांमध्ये सुरु आहेत. मॉरिशियस मेट्रो एक्सप्रेसचा पहिला टप्पा – पोर्ट लुईस ते रोझ हिलचे उद्घाटन नरेंद्र मोदी आणि प्रविंद जगन्नाथ, अनुक्रमे भारत व मॉरिशसचे पंतप्रधान यांनी केले होते.

या प्रकल्पाचा दुसरा टप्पा रोझ हिल ते क्वात्रे बोर्न्स दरम्यान असून त्याची सुरुवात यंदा मार्च महिन्यात झाली होती. दुसरा टप्पा क्वात्रे बोर्न्स ते क्युरपाइप दरम्यान असून त्याचे कामकाज डिसेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. एल अँड टी ला मेट्रो एक्सप्रेसच्या रोझ हिल ते रेड्युइट (इबेन सायबरसिटी मार्गे) या विस्तारित कामाचेही कंत्राट मिळाले आहे. त्याची सुरुवात सन 2022 च्या अखेरपासून होणार आहे.

loading image
go to top