घाऊक महागाई निर्देशांक मे महिन्यात ३.२१ टक्क्यांवर

वृत्तसंस्था
Monday, 15 June 2020

 मे महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक खाली येण्यात इंधन आणि वीज यांचा मोठा वाटा आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. मार्च महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक १ टक्क्यावर होता.

मे महिन्यात देशातील घाऊक महागाई निर्देशांक (डब्ल्यूपीआय) मे महिन्यात ३.२१ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी याच कालावधीत देशातील घाऊक महागाई निर्देशांक २.७९ टक्क्यांवर आला आहे. मे महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक खाली येण्यात इंधन आणि वीज यांचा मोठा वाटा आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. मार्च महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक १ टक्क्यावर होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

एप्रिल महिन्यात वाणिज्य मंत्रालयाला घाऊक किंमतींशी निगडित आकडेवारी गोळा करता आली नव्हती. २५ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे ही आकडेवारी गोळा करणे शक्य झाले नव्हते. लॉकडाऊन काळात वाणिज्य मंत्रालयाने आपल्या कार्यालयांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आकडेवारी गोळा करण्यास सांगितले आहे. एप्रिल २०२० साठीचा अंतिम निर्देशांक पुढील महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. 

अन्नधान्याच्या महागाईचा दर मे महिन्यात १.१३ टक्क्यांवर आला आहे. त्याआधीच्या महिन्यात तो २.५५ टक्के इतका होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मे महिन्यासाठीचा किरकोळ महागाई दर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाला तयार करता आलेला नाही. सलग दुसऱ्या महिन्यात केंद्र सरकार किरकोळ महागाई दर जाहीर करू शकणार नाही. सर्वसाधारणपणे किंमतींची आकडेवारी १,११४ शहरी बाजारपेठांमधून आणि १,१८१ ग्रामीण बाजारपेठांमधून गोळा करण्यात येते. यासाठी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे कर्मचारी प्रत्यक्ष बाजारांना भेट देऊन माहिती गोळा करत असतात. मे २०२० मध्ये लॉकडाऊनमुळे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाला ९८७ शहरी बाजारपेठा आणि ८३६ ग्रामीण बाजारपेठांमधूनच आकडेवारी गोळा करता आली आहे. 

हेही वाचा : आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्समध्ये ६५५ अंशांची घसरण

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया सध्या पतधोरण आखताना महागाई दर लक्षात घेते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In May, WPI is at 3.21 percent