आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्समध्ये ६५५ अंशांची घसरण

वृत्तसंस्था
Monday, 15 June 2020

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १८१अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये६५५अंशांची वाढ सकाळच्या सत्रात दिसून आली. सेन्सेक्स ३३,१२५अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे.

आज आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजारात घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात घसरण नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १८१अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ६५५ अंशांची वाढ सकाळच्या सत्रात दिसून आली. सेन्सेक्स ३३,१२५ अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी ९,७९१ अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे.

सकाळी बाजार खुला झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये ८०० अंशांची घसरण झाली होती. यामुळे गुंतवणूकदारांनी १.७६ लाख कोटी रुपये गमावले आहेत. चीनमध्ये कोविड-१९चा फैलाव पुन्हा सुरू झाल्याचा आणि अमेरिकन शेअर बाजाराने मागील तीन महिन्यातील सर्वात मोठी घसरण मागील आठवड्यात नोंदवलच्या नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याने चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. याचा विपरित परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाला आहे. चीन, जपान, द. कोरिया, हॉंगकॉंग या सर्वच आशियाई शेअर बाजारात त्यानंतर घसरण झाली आहे. भारतातही कोरोनाची रुग्ण संख्या वाढते आहे. याचा नकारात्मक परिणाम होत शेअर बाजारात घसरण सुरू झाली आहे. 

* सेन्सेक्स ३३,१२५ अंशांच्या पातळीवर
* निफ्टी ९,७९१ अंशांच्या पातळीवर 
* निफ्टीमध्ये १८१ अंशांची घसरण
* सेन्सेक्समध्ये ६५५ अंशांची घसरण

निफ्टी बॅंकसह सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रिय निर्देशांकात घसरण झाली आहे. इंडसइंड बॅंक, अॅक्सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, टाटा मोटर्स, एनटीपीसी, एसबीआय या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत ३.५ ते ५.५ टक्क्यांपर्यत घसरण झाली आहे. तर विप्रो, महिंद्रा अॅंड महिंद्रा, ओएनजीसी, झी एंटरटेनमेंट, एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत सुधारणा झाली आहे. 

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्येही घसरण नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतसुद्धा घसरण झाली आहे. एमसीएक्सवर कच्चे तेल २६५३ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ०.१५५ रुपयांनी घसरला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ७५.९९ रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share market reports fall in sensex & nifty Sensex falls 655 points