MDL : या डिफन्स सेक्टरच्या स्टॉकने 1 वर्षात दिला 130% रिटर्न, आणखी तेजी येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MDL

MDL : या डिफन्स सेक्टरच्या स्टॉकने 1 वर्षात दिला 130% रिटर्न, आणखी तेजी येणार

Mazagon Docks Shipbuilders Ltd : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे शेअर्स गेल्या 7 ट्रेडिंग सत्रांमध्ये 42 टक्क्यांनी वाढले आहेत. यासह स्टॉकच्या व्हॉल्यूममध्ये 4 पट वाढ झाली आहे. कंपनीला अलीकडच्या काळात मोठ्या ऑर्डर्स मिळाल्यात. त्यामुळे या शेअरमध्ये जोरदार खरेदी झाली. गेल्या 1 महिन्यात, या स्टॉकच्या डिलिव्हरी व्हॉल्यूममध्ये 5.48 टक्के वाढ झाली आहे आणि शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये, हा स्टॉक 6.37 टक्क्यांच्या वाढीसह 632.95 रुपयांवर बंद झाला.

हेही वाचा: Share Market : प्राज इंडस्ट्रीजचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर, आणखी तेजी येईल का ?

गेल्या 1 वर्षात माझगाव डॉकच्या शेअरने 130 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. तर या वर्षी आतापर्यंत हा स्टॉक 113 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, गेल्या 3 महिन्यांत 128 टक्के वाढ झाली आहे.

कंपनी भारतीय नौदलाला 8500 कोटी रुपयांचे डिस्ट्रॉयर पुरवणार असल्याची माहिती मिळत असल्याचे ऍक्सिस सिक्युरिटीज पीएमएसचे पोर्टफोलिओ मॅनेजर निशित मास्टर म्हणाले. तर या वर्षाअखेरीस पाणबुडीचा पुरवठा केला जाणार आहे.

कंपनीला कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून 2,500 कंटेनरचा पुरवठा करण्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. याशिवाय मुंबई पोर्ट ट्रस्टकडून लाँच बोटची मोठी ऑर्डरही मिळाली आहे. कंपनीला स्वदेशी मिडग्रेट पाणबुडीचे डिझाईन आणि विकासाची जबाबदारीही देण्यात आली आहे. कंपनीकडे सध्या 43,300 कोटी रुपयांच्या ऑर्डर आहेत. तर पुढे कंपनीला आणखी 7-8 अब्ज डॉलरच्या ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Share Market: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात पडझड, Tata चे शेअर्स घसरले

ज्यांना हे शेअर्स खरेदी करायचे आहेत त्यांनी हा स्टॉक 530-540 रुपयांच्या झोनमध्ये येण्याची वाट पहावी. येत्या काळात हा शेअर 660-670 रुपयांवर जाऊ शकतो असे चॉईस ब्रोकींगचे ओम मेहरा म्हणाले.

हेही वाचा: Share Market: एका लाखाचे 4 कोटी, एका रुपयापेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची भरारी...

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketStock Market