
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत होणारी बैठक पुढे ढकलली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत होणारी बैठक पुढे ढकलली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. तसेच व्यवहार ठप्प झाल्याने सर्व परिस्थितीचा तसेच बँकिंग व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अर्थमंत्री सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत बैठक घेणार होत्या. मात्र आता बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सीतारामन यांना पंतप्रधानच्या बैठकीला उपस्थित राहावे लागणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दरम्यान , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स असल्यामुळे बँक प्रमुखांसोबतची बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बँक प्रमुखांच्या बैठकीत पुढील मुद्दे चर्चिले जाणार होते
- रिझर्व्ह बँकेने रेपो दर कपात करूनही बँकांकडून ग्राहकांना थेट फायदा पोचवण्यात आलेला नाही.
- लॉकडाउन दरम्यान बँकांकडून झालेल्या कर्ज वाटपाबाबत आढावा
- बँकिंग व्यवस्थेत उपलब्ध अतिरिक्त रोकड आणि कर्ज वसुलीला तीन महिन्यांची स्थगिती
अशा विविज विषयांवर चर्चा अपेक्षित होती.