देशाच्या अर्थव्यवस्थेतील महाराष्ट्राच्या योगदानाबद्दल राहुल गांधी म्हणाले, ....

टीम ई-सकाळ
Saturday, 16 May 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशाचा आर्थिक गाडा कोलमडला आहे. याच पार्श्वभूमीवर  राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून स्थानिक स्तरावरील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र राज्यातील एका पत्रकाराने राहुल गांधी यांना राज्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळाले.

 नवी दिल्ली : देश संकटजन्य काळातून जात असताना केंद्र सरकारकडे बोट दाखवणार नाही. योग्य त्या सूचनांच्या माध्यमातून आम्ही प्रेमळ भाषेत सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत राहू, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशाचा आर्थिक गाडा कोलमडला आहे. याच पार्श्वभूमीवर  राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून स्थानिक स्तरावरील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र राज्यातील एका पत्रकाराने राहुल गांधी यांना राज्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळाले.

कैद्यावर लक्ष ठेऊन असलेल्या पोलिसांचा मध्यरात्री लागला डोळा अन् दोन तासांनी उघडकीस आली ही घटना...

महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. राज्यातील उद्योगधंद्याची व्यापी पाहता राज्यासाठी विषेश तरतूदींसदर्भात काँग्रेस सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार का? असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र हे विशेष राज्य असून देशातील अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. केंद्राकडून महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांना योग्य ते सहकार्य मिळायला हवे.

लॉकडाउनचा तिरुपती देवस्थानलाही फटका; झालं एवढ्या रुपयांचं नुकसान  

सध्याच्या घडीला केंद्राचे काम हे व्यवस्थापनाचे असून राज्याने कामाची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया अंगीकारण्याची गरज आहे. सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडून निर्णय घेतले जात आहेत. केंद्र सरकारने व्यवस्थापनावर भर देऊन सर्व अधिकार राज्याकडे द्यायला हवेत, असा सल्लाही यावेळी राहुल गांधी यांनी दिला. देशातील ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे त्या राज्यातील मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देत आहोत, असेही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले.

जगाचा नव्हे देशाचा विचार करा! राहुल गांधींचा मोदींना प्रेमळ सल्ला

कोरोनामुळे देशभरात निर्माण झालेल्या संकटाच्या काळात दिली जाणाऱ्या मदतीवेळी केंद्र सरकारकडून  भाजप शासित राज्यांकडे अधिक लक्ष दिल जातय का? असा प्रश्नही राहुल गांधी यांना विचारण्यात आला होता. सध्याच्या घडीला सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवण्याची वेळ नाही. आम्ही काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात योग्य त्या तरतूदी करत आहोत. केंद्र सरकारलाही याबाबत सूचना दिल्या असून मोदी सरकार आमच्या  योग्य सूचनांवर विचार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mharashtra State Is Center Of Indian Economy Says rahul gandhi