
रिझर्व्ह बँकेचे एकुण चार डेप्युटी गव्हर्नर्स असतात. यापैकी दोघांची निवड अंतर्गत पद्धतीने होते, तर उर्वरित दोघांपैकी एक व्यावसायिक बँकर आणि पतधोरण समितीचा मुख्य अर्थतज्ज्ञ असतो.
मुंबई : सेंट्रल बँकेचे कार्यकारी संचालक मायकल देबप्रत पात्रा यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नरपदी निवड करण्यात आली आहे. नियुक्तीपासून तीन वर्षांसाठी ते ह्या पदावर कार्यरत राहतील. विरल आचार्य यांच्या राजीनाम्यानंतर मागील सहा महिन्यापासून हे पद रिकामे होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ. विरल आचार्य यांनी त्यांची तीन वर्षे मुदत संपायच्या आतच जुलै 2019मध्ये वैयक्तिक कारण पुढे करत राजीनामा दिला होता. रिझव्र्ह बँकेकडील राखीव रक्कम या मुद्द्यावर सरकार आणि रिझव्र्ह बँक यांच्यात मतभेद झाल्यानंतर आचार्य यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर सातत्याने आचार्य यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती.त्यातूनच त्यांनी राजीनामा दिला होता.
रिझर्व्ह बँकेचे एकुण चार डेप्युटी गव्हर्नर्स असतात. यापैकी दोघांची निवड अंतर्गत पद्धतीने होते, तर उर्वरित दोघांपैकी एक व्यावसायिक बँकर आणि पतधोरण समितीचा मुख्य अर्थतज्ज्ञ असतो. वर्तमान स्थितीत एनएस विश्वनाथन, बीपी कानुंगो आणि एमके जैन हे तिघे डेप्युटी गव्हर्नरपदी कार्यरत आहेत. शक्तिकांत दास आरबीआयचे गव्हर्नर आहेत.