esakal | मायक्रोसॉफ्ट तेलंगनात उभारणार डेटा सेंटर; 15 हजार कोटींच्या गुंतवणुकीची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

Microsoft

मायक्रोसॉफ्ट आणि तेलंगना सरकार यांच्यात डेटा सेंटरच्या उभारणीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.

मायक्रोसॉफ्ट तेलंगनात उभारणार डेटा सेंटर; 15 हजार कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - मायक्रोसॉफ्ट आणि तेलंगना सरकार यांच्यात डेटा सेंटरच्या उभारणीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तेलंगनातील या प्रोजेक्टमध्ये मायक्रोसॉफ्ट एकत्रित 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. अमेरिकन टेक कंपनीला यासाठी हैदराबादजवळ इमारतींसाठी जागा देण्यात येणार आहे.

BAM डिजिटल रियल्टी या ब्रँडच्या नावाखाली भारतात डेटा सेंटर डेव्हलप करण्याची मायक्रोसॉफ्टची योजना आहे. ब्रूकफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चरच्या योजनेतून संयुक्त असं सुविधा असलेले डेटा सेंटर उभारलं जाणार आहे. ब्रूकफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर ही कॅनडातील ब्रूकफिल्ड आणि NYSE याच्या यादीतील डिजिटल रियल्टी कंपनी आहे. जगभरात डेटा सेंटर पुरवण्याचं काम यांच्याकडून केलं जातं.

हेही वाचा: सरकार पाडण्यासाठी कर्नाटकात ‘पेगॅसस’चा वापर?

माहिती तंत्रज्ञानाच्या जगात तेलंगनामध्ये आधीच अनेक मोठ्या गुंतवणुकी झाल्याचं दिसतं. मायक्रोसॉफ्ट डेटा सेंटरची उभारणीची तयारी करत असून लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाईल अशी माहिती सूत्रांनी बिझनेस स्टँडर्डला दिली आहे. यावर मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

2019 मध्ये मायक्रोसॉफ्ट आणि रिलायन्स जिओ यांनी क्लाउड डेटा सेंटरसाठी लाँग टर्म मुदतीसाठी डील केलं होतं. या कराराचा एक भाग म्हणून क्लाउड कम्युटिंग सर्विस Azure Cloud हे जिओ नेटवर्कवर आणले होते. याच्या माध्यमातून लहान उद्योगांना क्लाउड टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चरकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले गेले. मायक्रोसॉफ्टशिवाय गुगल, अमॅझॉन वेब सर्विसेस यांची देशातील डेटा सेंटर क्षेत्रात असलेली गुंतवणूक वाढवली जात आहे.

loading image