फक्त 12,000 रुपये गुंतवून कोट्यधीश, 20 वर्षात एवढा परतावा...

गुंतवणूकदारांनी चांगल्या कंपनीत पैसे गुंतवले आणि गुंतवणूक कायम ठेवले तर काय होते याचे उदाहरण म्हणजे कामा होल्डिंग्ज.
shares
sharesgoogle
Updated on

मुंबई : शेअर बाजारात कामा होल्डिंग्ज लिमिटेड Kama Holdings Ltd) ही अशा कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी गेल्या 20 वर्षांत त्यांच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नफा मिळवून दिला आहे.

8.45 हजार कोटी रुपयांच्या या मिडकॅप कंपनीने गेल्या 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे 8 कोटी रुपये केले आहेत. गुंतवणूकदारांनी चांगल्या कंपनीत पैसे गुंतवले आणि गुंतवणूक कायम ठेवले तर काय होते याचे उदाहरण म्हणजे कामा होल्डिंग्ज.

20 वर्षात 15 रुपये ते 13,000 रुपयांपर्यंत मजल

कामा होल्डिंग्जचे शेअर्स बीएसईवर 13,099.70 रुपयांवर ट्रेड करत आहेत. पण 19 जुलै 2002 रोजी बीएसईवर कामा होल्डिंग्जच्या शेअर्सनी पहिल्यांदा ट्रेडींग सुरु केले तेव्हा त्याची किंमत केवळ 15.50 रुपये होती. तेव्हापासून त्याच्या शेअर्सची किंमत सुमारे 84,414 टक्क्यांनी वाढली आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी कामा होल्डिंग्जच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 8 कोटी 45 लाख रुपये झाले असते. दुसरीकडे, एखाद्या गुंतवणूकदाराने त्या वेळी या कंपनीत फक्त 12,000 रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 कोटी रुपये झाले असते.

5 वर्षात 379% रिटर्न

कामा होल्डिंग्जचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 1.36% टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, या वर्षाच्या सुरुवातीपासून ते सुमारे 22.39 टक्के वाढले आहे. तर गेल्या 5 वर्षात त्याच्या शेअर्सनी 379.34 टक्के मल्टीबॅगर दिला आहे.

कामा होल्डिंग्ज आपल्या तीन उपकंपन्यांद्वारे शिक्षण, रिअल इस्टेट आणि इनवेस्टमेंटमध्ये व्यवसाय करते. या तीन कंपन्यांमध्ये श्री एज्युकेअर लिमिटेड (Shri Educare Limited), कामा रियल्टी दिल्ली लिमिटेड (KAMA Realty Delhi Limited) आणि एसआरएफ ट्रान्सनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (SRF Transnational Holdings Limited)यांचा समावेश आहे.

श्री एड्यूर लिमिटेड (Shree Edure Limited - SEL) ही भारत आणि परदेशात एज्युकेशलन कंसल्टेशन आणि (नर्सरी ते इयत्ता 12) आणि प्री-स्कूल सुरू करून दर्जेदार शिक्षण देणारी संस्था आहे. या शाळा SRF फाउंडेशनचा उपक्रम 'श्री राम स्कूल' च्या धर्तीवर तयार करण्यात आल्या आहेत.

कामा रियल्टी (दिल्ली) लिमिटेडकडे गुडगाव आणि मुंबईमध्ये अनेक कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत. तर एसआरएफ ट्रांसनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (SRF Transnational Holdings Limited) ही नोंदणीकृत NBFC आहे जी इतर कंपन्यांच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणुकीच्या व्यवसायात गुंतलेली आहे. एसआरएफ लिमिटेड, एसआरएफ पॉलिमर्स इन्व्हेस्टमेंट्सही कामा होल्डिंगची उपकंपनी आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com