सायरस यांच्याकडून ‘मिस्त्री व्हेंचर्स’ची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

मुंबई - ‘टाटा’च्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी होऊन दोन वर्ष लोटल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी आज ‘मिस्त्री व्हेंचर्स’ (एलएलपी) या नवीन कंपनीची घोषणा केली आहे. भारतासह जगभरातील स्टार्टअपना सुरवातीला तसेच, विस्तारासाठी लागणारे भांडवल उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामागे असल्याची माहिती मिस्त्री यांनी दिली. 

बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे पार्टनर आणि आधीचे ग्लोबल लीडर आशिष अय्यर यांच्याकडे नवीन कंपनीचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. आशिष यांनी जगभरात विविध क्षेत्रांतील कंपन्यांबरोबर काम केले असून, स्ट्रॅटॅजी, गो-टू-मार्केट, डिजिटल इनोव्हेशन अशा क्षेत्रात त्यांना नैपुण्य प्राप्त असल्याचे मिस्त्री यांनी सांगितले. मिस्त्री व्हेंचर्स एलएलपी ही शापूर मिस्त्री आणि सायरस मिस्त्री यांनी संयुक्तपणे प्रवर्तित केलेली संस्था आहे. जी शापूरजी पालनजी या जागतिक स्तरावर उपस्थिती बहुक्षेत्रीय समूहाची प्रवर्तक आहे.

मिस्त्री व्हेंचर्स फक्त कंपन्यांमध्ये गुंतवणुकीपुरती मर्यादित नसेल. ती स्टार्टअप्सना बहुमूल्य सल्ला देण्याबरोबरच नवीन उद्यमशीलता व कौशल्यही देऊ करेल. ज्याद्वारे त्यांना उत्पादने तपासणी, प्रमाण याबाबत योग्य प्रयोग करता येतील आणि सेवा-उत्पादने बाजारपेठेत लवकर आणता येतील. 
- सायरस मिस्त्री

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mistry Ventures Announced by Sairas Mistry